ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या आंदोलनात आमदार मंगेशदादा चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी...... संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
संगणक परीचालकांच्या नागपूर येथील आंदोलनात आ. मंगेश चव्हाण यांची यशस्वी मध्यस्थी
ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर संगणक परिचालकांच्या संघटनेने घेतला मोर्चा मागे..!
नागपूर प्रतिनिधी : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मोर्चा घेऊन गेलेल्या राज्यातील हजारो संगणक परिचालक यांच्या मदतीला आमदार मंगेश चव्हाण धावून आल्याचे बघायला मिळाले. नागपूर येथे दिवसभर सुरू असलेल्या या आंदोलनात शासनाकडून कुठेलही ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा मागे घेणार नाही अशी भूमिका राज्यभरातून आलेल्या संगणक परीचालकांनी घेतली होती. रात्र होऊनही त्यांनी आंदोलन स्थगित न केल्याचे तसेच सदर आंदोलनात राज्यभरातून महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांना कळताच त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या मागण्या समजून घेतल्या.
आमदार मंगेश चव्हाण यांनी ही बाब ग्रामविकास मंत्री नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी सांगितले की शासन देखील याबाबत सकारात्मक आहे लवकरच याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यासाठी पत्र देखील मंत्री महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना तात्काळ दिले व शासनाच्या वतीने सदर आंदोलकांशी चर्चा करण्याच्या सूचना आमदार चव्हाण यांना दिल्या.
तद्नंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी ग्रामविकास मंत्री नामदार गिरीषभाऊ महाजन यांचे बैठकीचे लेखी आश्वासन असलेले पत्र आंदोलनस्थळी घेऊन जात मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला.
लवकरच मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांचे अधिकारी व संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. नामदार महाजन व आमदार चव्हाण यांच्या आश्वासनानंतर संगणक परिचालक संघटनेने आपला मोर्चा स्थगित करत असल्याचे जाहीर केले व संगणक परिचालकांच्या मागण्यांची दखल घेत धावून आल्याबद्दल आमदार चव्हाण यांचे आभार मानले.
मी खान्देशी न्यूज
मुख्य संपादक - श्री.एस.डी.पाटील
संपर्क-9975405488
Email - mikhandeshinews@gmail.com
Comments
Post a Comment