फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती तर्फे रुग्णवाहिका चालकांचा सन्मान

 फैजपूर येथे खान्देश नारीशक्ती तर्फे रुग्णवाहिका चालकांचा सन्मान


फैजपूर प्रतिनिधी:कोरोना महामारीच्या संकटकाळात स्वताचा जीव धोक्यात घालून रुग्णांना वेळेत हॉस्पिटलमध्ये नेण्याची महत्त्वपुर्ण भुमिका बजावणार्या रुग्णवाहिका चालकांचा कोरोना योद्धा म्हणुन  खान्देश नारीशक्ती गृप, दिपाली गृप्स तर्फे सन्मान करण्यात आला.

   फैजपूर येथील शासकीय रुग्णवाहिका चालक श्री.निलेश प्रभाकर काकर,श्री.ललित खैरे या  रात्रंदिवस रुग्णवाहिका सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालकांचा सन्मानपत्र देऊन खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.यावेळी जन संघ सेवक मंच प्रदेश उपाध्यक्ष संदिप भाऊ पाटील,कृषी पदवीधर युवा शक्ती संघटना तालुका अध्यक्ष अक्षय भाऊ धांडे,श्री.देवेंद्र झोपे सर उपस्थित होते.

   कोरोनाच्या पार्क्ष्वभुमिवर रुग्णवाहीका चालकांच्या कार्याची दखल घेऊन सन्मान केल्याबद्दल खान्देश नारीशक्ती गृप चे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व