जळगावात भाजप कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील प्रभाग क्रमांक १५ ईच्छादेवी परिसरातील ६१ भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी रविवारी शिवसेनेत प्रवेश केला. महानगरप्रमुख शरद तायडे यांच्यासह नगरसेवक प्रशांत नाईक, विरोधीपक्षनेते सुनील महाजन यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

जळगाव महानगरपालिकेत भाजप ची सत्ता असुन देखील प्रभागातील कामे होत नसुन आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही मग सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असुन काय उपयोग? असे म्हणत जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १५ इच्छादेवी परिसरातील जवळपास ६१ भाजप कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

  सदर कार्यकर्ते हे भाजपा चे माजी महानगराध्यक्ष व माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांचे समर्थक असल्याचे बोलले जात आहे.अशोक लाडवंजारी हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे निकटवर्तीय व खंदे समर्थक असल्याने या पक्षांतराची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व