भारतीय राष्ट्रीय युवा परीषदेतर्फे भुसावळ येथे गुणवंतांचा सत्कार
कोरोनामूळे यंदा दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा सार्वजनिक स्वरुपात झाला नाही. मात्र जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेच्या माध्यमातून भुसावळ तालूका युवा परिषदेने फेब्रुवारी व मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परिक्षेत तालूक्यात विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या १५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डाॕ.सुनील नेवे यांच्यासह प्रमोदकुमार शुक्ल, राजेश महाजन ,प्रतिक्षा पाटील,अनिल बाविस्कर,दिव्या भोसले,अविनाश जावळे,योगेश चौधरी आदींची उपस्थिती होती.कार्यक्रमात तेजस पाटील,सुनील नेवे,प्रमोदकुमार शुक्ल आदी मान्यवरानी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष आकाश इंगळे,उपाध्यक्ष गिरीश पाटील,महासचिव नोविता कोल्हे, सचिव रितेश भारंबे,तालुका समन्वयक रोहीत पाटील, पुजा पाटील, तेजस्वी चौधरी आदीनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment