मराठा समाजाला संरक्षित व सुरक्षित आरक्षण मिळावे-खा.उन्मेश पाटलांनी लोकसभेत केली मागणी
चाळीसगाव प्रतिनिधी:मोठ्या संघर्षानंतर , अनेक आंदोलने केल्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते., मात्र आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. दुर्दैवाने विद्यार्थी , तरुण यांच्यात आरक्षण स्थगित केल्याने निराशा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे. या ज्वलंत प्रश्नांवर आंदोलने सुरू झाली आहेत. माझी विनंती राहील की राज्य सरकारला संरक्षित,सुरक्षित आरक्षण मिळणे साठी राज्य सरकारला आदेश करावेत, समाजाला न्याय मिळवून द्यावा.अशी मागणी जळगाव चे खासदार उन्मेष पाटील यांनी आज लोकसभेत केली.
आपल्या रोखठोक शैलीने नेहमी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्यासाठी खा.उन्मेष पाटील प्रसिद्ध आहेत.मराठा समाजाच्या प्रश्नांवर यापुर्वीही अनेक वेळा खा.पाटील यांनी सभागृहात मुद्दा उपस्थित केला आहे.तसेच वेळोवेळी समाजासाठी आंदोलनात देखील सहभाग घेतला आहे.लवकरात लवकर मराठा समाजाला संरक्षित आरक्षण मिळणे साठी राज्य सरकारला आदेश करावा व समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.
Comments
Post a Comment