Posts

Showing posts from July, 2021

भाजयुमो विद्यार्थी आघाडी व आ.मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत CET परीक्षा फॉर्म सुविधा

Image
भाजपा युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यातर्फे १० वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत CET परीक्षा फॉर्म सुविधा...  चाळीसगाव प्रतिनिधी: तालुक्यातील १० वी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी विभाग व आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने मोफत CET च्या परीक्षेचा फॉर्म भरून देण्यासाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे.          तरी विद्यार्थ्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे जनसेवा कार्यालय, करगाव रोड, चाळीसगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष भावेश कोठावदे व  विद्यार्थी विभाग शहराध्यक्ष सिद्धांत पाटील यांनी केले आहे. सदर CET परीक्षा फॉर्म भरण्यासाठी खालील संपर्क क्रमांकांवर देखील माहिती घेऊ शकता. 1) राहुल नकवाल (उपक्रम संयोजक) - मो.न- 8888740085  २) लोकेश वाणी  मो.9881177400  3) राहुल महाजन मो.9322482142 ४) ललित हिरे  मो. 8055479977  ५) यश चिंचोले  मो. 9834172901 ६) राकेश कोठावदे मो.7020164274

भाजपा किसान मोर्चा ची बुधवारी महत्वपूर्ण जिल्हा बैठक

Image
भाजपा किसान मोर्चा ची बुधवारी महत्वपूर्ण जिल्हा बैठक जळगाव प्रतिनिधी : बुधवारी दि.२८ रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ची महत्वपूर्ण बैठक ब्राह्मण सभा हॉल बळीराम पेठ जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे.या बैठकीला शेतकरी संवाद अभियान असे स्वरुप देण्यात आले आहे.       सदर बैठकीस किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेवजी काळे, प्रदेश संघटन सरचिटणीस मकरंद जी कोरडे, प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस सुधाकर भोयर, माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्यासह सर्व खासदार, आमदार,आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.      या बैठकीला सर्व जिल्हा,तालुका किसान मोर्चा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व कार्यकारीणी तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी यांनी केले आहे.

माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही-आ.मंगेश चव्हाण

Image
माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही-आ.मंगेश चव्हाण संदिप पाटील चाळीसगाव: माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही तुमच्या मागण्यांना शासन दरबारी पोहचविण्यासाठी विरोधी पक्षनेते माजी.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे कडे निवेदन देऊन मी गांभीर्याने लक्ष घालेल,तुमच्यावर कार्यवाही झाल्यास माझे दरवाजे मदतीसाठी सदैव उघडे आहेत. असा विश्वास  चाळीसगाव तालुक्यातील शासकीय व खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला.          महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या निबंधकांनी ९ जुलै २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी,सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आदी अधिकाऱ्यांना पात्रता नसतांना पशुवैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या पदविकाधारकांवर कार्यवाही करण्याचे पत्र दिले होते. यामुळे राज्यात एक लाखाहून अधिक संख्या असलेल्या खाजगी व शासकीय सेवेतील पशुवैद्य पदविका,प्रमाणपत्र धारकांत संतापाची लाट उसळली.त्यातुन पशुवैद्यकीय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सेवा संघ व पशुचिकित्सा व्यवसायी या संघटनांनी कामबंद आंदोलन सुरु केले ...

रुग्णसंख्या एक नंबरवर असतांना देखील चाळीसगावात खासगी क्लासेस फुल्ल? ‌ विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करुन लाखोंची उलाढाल; यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा

Image
रुग्णसंख्या एक नंबरवर असतांना देखील चाळीसगावात खासगी क्लासेस फुल्ल? विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करुन लाखोंची उलाढाल;यामागे मोठे अर्थकारण असल्याची चर्चा संदिप पाटील चाळीसगाव: जिवघेण्या कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत चाळीसगाव तालुका गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात एक नंबरवर असतांना देखील चाळीसगाव शहरात खाजगी कोचिंग क्लासेस शासनाचे नियम पायदळी तुडवून व विनापरवानगी जोरात सुरु झालेले दिसत आहेत.         शासनाने कोरोनासंदर्भात कडक निर्बंध घातले असून विविध गोरगरीब व्यवसायिक,हातमजूरी करणारे गरीब लोक, फेरीवाले तसेच लहान मोठे टपरीधारक यांना नियम पाळण्याची सक्ती केली जात असून बिचारे हातावर पोट असतांना एकवेळ उपाशी राहून देखील प्रशासनाला नियम पाळून सहकार्य करीत आहेत.मात्र विना परवानगी वर्षाला लाखो रुपयांची कमाई करणारे खासगी क्लासेस चालकांना या कोरोना नियमांमधून सुट देण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोणाच्या आशिर्वादाने क्लासेस सुरू आहे? परवानगी दिली कोणी?      कोरोना रुग्णसंख्या व संभाव्य तिसरी लाट या गोष्टींचा विचार करू...

चाळीसगाव भाजपाने बंजारा समाजाला दिला योग्य न्याय; अफवांवर विश्वास ठेवू नये-प्रा.सुनिल निकम, तालुकाध्यक्ष चाळीसगाव भाजपा

Image
चाळीसगाव तालुक्यात कालपासून सोशल मीडिया वर एक मेसेज व्हायरल केला जात आहे की भाजपा चाळीसगाव तालुका संघटनेत गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमधे बंजारा समाजातील एकाही कार्यकर्त्याला संधी दिली नाही.आज या आरोपांबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम सर यांनी जाहीर खुलासा सादर केला असून त्यामध्ये त्यांनी बंजारा समाजातील पदाधिकारी व त्यांचे नियुक्तीपत्र देखील सादर केले असून यासंदर्भात सोशल मीडिया वर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जाहीर खुलासा 🙏🙏🙏🙏 बंजारा समाजाला चाळीसगाव भारतीय जनता पक्षाने दिला योग्य न्याय 🙏🙏🙏🙏 अफवांवर विश्वास ठेवु नये 🙏🙏🙏🙏 सोशलमिडीयावर बंजारा समाजाला चाळीसगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाने एकही पद दिले नसल्याची चुकीची आणि खोटी पोस्ट. 🙏🙏🙏🙏 1)चाळीसगाव भारतीय जनता पक्षाने रांजणगाव-पाटणा गटप्रमुख म्हणून आदर्श व्यक्तीमत्व श्री. मच्छिंद्र जगन्नाथ राठोड(मच्छुभाऊ) यांची नियुक्ती केली आहे 2)पाटणा पंचायत समिती गणप्रमुख म्हणून उत्तम संघटक श्री. उमेश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे 3)तळेगाव पंचायत समिती गणपालक म्हणून आदर्श सरपं...

चाळीसगाव भाजपाच्या वतीने आघाडी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

Image
भाजपा आमदारांच्या निलंबन निषेधार्थ चाळीसगाव भाजपाच्या वतीने अंत्ययात्रा काढून आघाडी सरकार चा निषेध खान्देश न्युज नेटवर्क: महाविकास आघाडीच्या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन केले सभागृहांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळावं या हेतूने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सभागृहामध्ये विषय मांडत असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घोषणाबाजी दिली याचा राग धरून व भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ कसे कमी करता येईल या द्वेषापोटी बारा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले व निलंबित केले म्हणूनच आज चाळीसगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला व सपूर्ण परिसर दणाणून गेला होता.        याप्रसंगी जिल्हा चिटणीस ॲड.प्रशांत पालवे तालुका अध्यक्ष प्रा. सुनील निकम,शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील ,नपा चे गटनेते संजय रतनसिंग पाटील , सरचिटणीस अमोल नानकर ,गिरीश बराटे, जितेंद्र वाघ ,अमोल चव्ह...