चाळीसगाव भाजपाच्या वतीने आघाडी शासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

भाजपा आमदारांच्या निलंबन निषेधार्थ चाळीसगाव भाजपाच्या वतीने अंत्ययात्रा काढून आघाडी सरकार चा निषेध

खान्देश न्युज नेटवर्क: महाविकास आघाडीच्या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांचे निलंबन केले सभागृहांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळावं या हेतूने महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सभागृहामध्ये विषय मांडत असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी घोषणाबाजी दिली याचा राग धरून व भारतीय जनता पार्टीचे संख्याबळ कसे कमी करता येईल या द्वेषापोटी बारा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले व निलंबित केले म्हणूनच आज चाळीसगाव भारतीय जनता पार्टी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारची अंत्ययात्रा काढून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला व सपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
       याप्रसंगी जिल्हा चिटणीस ॲड.प्रशांत पालवे तालुका अध्यक्ष प्रा. सुनील निकम,शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील,पंचायत समितीचे गटनेते संजय पाटील ,नपा चे गटनेते संजय रतनसिंग पाटील , सरचिटणीस अमोल नानकर ,गिरीश बराटे, जितेंद्र वाघ ,अमोल चव्हाण  योगेश खंडेलवाल ,पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक नितीन पाटील चंद्रकांत तायडे, अरुण अहिरे,भास्कर पाटील ,आनंद खरात, श्री. बबन पवार, श्री. बंडू पगार,माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी ,युवा मोर्चा अध्यक्ष भावेश कोठावदे पदाधिकारी रणजित देशमुख सदानंद चौधरी ,विकास महाजन,दीपक परदेशी, किशोर रणधीर,विकास चौधरी,निवृत्ती कवडे ,राम पाटील,देवेंद्र पाटील,अमोल घोडे ,सचिन चव्हाण ,विशाल पाटील ,मनोज गोसावी ललित महाजन ,दिनेश चौधरी,गौरव पुरकर अभिषेक मोरे,राकेश बोरसे,गोपाळ चौधरी, प्रविण मराठे,निखील पवार विशाल सोनवणे,बंडू पगार, बबन पवार,यांच्यासह मोठ्याप्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व