माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही-आ.मंगेश चव्हाण

माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही-आ.मंगेश चव्हाण

संदिप पाटील चाळीसगाव: माझ्या मतदार संघातील पदविकाधारक पशुवैद्यकांवर अन्याय होऊ देणार नाही तुमच्या मागण्यांना शासन दरबारी पोहचविण्यासाठी विरोधी पक्षनेते माजी.मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे कडे निवेदन देऊन मी गांभीर्याने लक्ष घालेल,तुमच्यावर कार्यवाही झाल्यास माझे दरवाजे मदतीसाठी सदैव उघडे आहेत. असा विश्वास  चाळीसगाव तालुक्यातील शासकीय व खाजगी पदविकाधारक पशुवैद्यकांना आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला. 
        महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेच्या निबंधकांनी ९ जुलै २०२१ रोजी सर्व जिल्हाधिकारी,सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आदी अधिकाऱ्यांना पात्रता नसतांना पशुवैद्यकिय व्यवसाय करणाऱ्या पदविकाधारकांवर कार्यवाही करण्याचे पत्र दिले होते. यामुळे राज्यात एक लाखाहून अधिक संख्या असलेल्या खाजगी व शासकीय सेवेतील पशुवैद्य पदविका,प्रमाणपत्र धारकांत संतापाची लाट उसळली.त्यातुन पशुवैद्यकीय,पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सेवा संघ व पशुचिकित्सा व्यवसायी या संघटनांनी कामबंद आंदोलन सुरु केले सदर आंदोलनाच्या मागण्याचे निवेदन चाळीसगाव येथे स्विकारतांना आ.मंगेश चव्हाण बोलत होते.
        पदविका/प्रमाणपत्र शिक्षित असलेले पशुवैद्यक महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन खात्यामध्ये पशुधन पर्यवेक्षक या शासनाच्या पदावर व शासन सेवेत नसलेले खाजगी पशुचिकित्सा सेवेचे काम करतात. गाय म्हशींमध्ये कृत्रिम रेतन,गर्भ तपासणी, लसीकरण,वंध्यत्वावर साधारण उपचार करणे आदी लघु पशुवैद्यकीय सेवांमाध्यमातुन राज्यात करोडोच्या संख्येने असलेले पशुधन निरोगी ठेऊन त्यांच्या ज्ञानाचा उपयोग पशुपालक शेतकऱ्यांसाठी करतात. त्यातुन राज्यातील दिड लाखाहून अधिक संख्या असलेले पशुवैद्यकीय पदविकाधारक यांना रोजगार प्राप्त होतो. महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद या पुर्वी पदविका/प्रमाणपत्र धारकांना डॉक्टर म्हणुन नोंदणी प्रमाणपत्र बहाल करत होती शासनाच्या बदलत्या धोरणात पशुवैद्यकीय सेवेचे काम पदविकाधारकांकडून करून घेत आहेत.परंतु टप्याटप्याने हळुवार कायदेशीर पशुसेवेचे अधिकार बदल करत त्यांच्या अर्हतेचे व घटनादत्त अधिकारांचे हनन शासन करत आहे यामुळे हे लाखो पदविकाधारक बेरोजगार होतील तेच बोगस पशुवैद्यक डॉक्टर म्हणुन कार्यवाहीच्या सूचना करत आहे.त्यामुळे ही बाब अन्यायकारक असुन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.खाजगी पशुवैद्यकीय संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष डॉ.दिपक आहेर यांनी मार्गदर्शन करून संघटनेची बाजू मांडली.यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ.संजय साळुंखे,उपाध्यक्ष डॉ.प्रवीण पाटील,सचिव डॉ.शिंदे, कार्याध्यक्ष डॉ.शेवाळे, डॉ.चिरके,डॉ.ठाकरे,डॉ.देवकर,डॉ.दरेकर,डॉ गोरख,डॉ.योगेश बाविस्कर,डॉ.गवळी,डॉ.जाधव, डॉ.निळकंठ मगर,डॉ.अमोल,डॉ.मोहन राठोड,डॉ.संदीप जाधव, डॉ.महाजन,डॉ.राठोड,डॉ.प्रवीण साळुंखे,डॉ.पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व