भाजपा किसान मोर्चा ची बुधवारी महत्वपूर्ण जिल्हा बैठक
जळगाव प्रतिनिधी: बुधवारी दि.२८ रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा ची महत्वपूर्ण बैठक ब्राह्मण सभा हॉल बळीराम पेठ जळगाव येथे आयोजित करण्यात आलेली आहे.या बैठकीला शेतकरी संवाद अभियान असे स्वरुप देण्यात आले आहे.
सदर बैठकीस किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेवजी काळे, प्रदेश संघटन सरचिटणीस मकरंद जी कोरडे, प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस सुधाकर भोयर, माजी पालकमंत्री गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष राजुमामा भोळे यांच्यासह सर्व खासदार, आमदार,आजी माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला सर्व जिल्हा,तालुका किसान मोर्चा पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी व कार्यकारीणी तसेच शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी यांनी केले आहे.
Comments
Post a Comment