चाळीसगाव भाजपाने बंजारा समाजाला दिला योग्य न्याय; अफवांवर विश्वास ठेवू नये-प्रा.सुनिल निकम, तालुकाध्यक्ष चाळीसगाव भाजपा
चाळीसगाव तालुक्यात कालपासून सोशल मीडिया वर एक मेसेज व्हायरल केला जात आहे की भाजपा चाळीसगाव तालुका संघटनेत गेल्या आठवड्यात करण्यात आलेल्या नवीन नियुक्त्यांमधे बंजारा समाजातील एकाही कार्यकर्त्याला संधी दिली नाही.आज या आरोपांबद्दल भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम सर यांनी जाहीर खुलासा सादर केला असून त्यामध्ये त्यांनी बंजारा समाजातील पदाधिकारी व त्यांचे नियुक्तीपत्र देखील सादर केले असून यासंदर्भात सोशल मीडिया वर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
जाहीर खुलासा
🙏🙏🙏🙏
बंजारा समाजाला चाळीसगाव भारतीय जनता पक्षाने दिला योग्य न्याय
🙏🙏🙏🙏
अफवांवर विश्वास ठेवु नये
🙏🙏🙏🙏
सोशलमिडीयावर बंजारा समाजाला चाळीसगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाने एकही पद दिले नसल्याची चुकीची आणि खोटी पोस्ट.
🙏🙏🙏🙏
1)चाळीसगाव भारतीय जनता पक्षाने रांजणगाव-पाटणा गटप्रमुख म्हणून आदर्श व्यक्तीमत्व श्री. मच्छिंद्र जगन्नाथ राठोड(मच्छुभाऊ) यांची नियुक्ती केली आहे
2)पाटणा पंचायत समिती गणप्रमुख म्हणून उत्तम संघटक श्री. उमेश आव्हाड यांची नियुक्ती केली आहे
3)तळेगाव पंचायत समिती गणपालक म्हणून आदर्श सरपंच श्री. संतोषभाऊ राठोड यांची नियुक्ती केली आहे
4)करगाव पंचायत समिती गणप्रमुख म्हणून डासमुक्त गावाचे शिल्पकार श्री.दिनकरभाऊ राठोड यांची नियुक्ती केली आहे
🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment