निकष न लावता पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे चाळीसगाव पूरग्रस्तांना मदत जाहीर करा - आ.मंगेश चव्हाण
निकष न लावता पश्चिम महाराष्ट्रासाठी लावलेल्या दरांप्रमाणे चाळीसगाव तालुक्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर करावी - आमदार मंगेश चव्हाण खान्देश न्युज नेटवर्क चाळीसगाव - चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अचानक आलेल्या पुरात १८ ते २० गावे बाधित झाली असून आतापर्यंत पुरामुळे ४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ७०० ते ८०० गुरे, हजारो घर पाण्याखाली गेल्याने ही सर्व कुटुंब उघड्यावर आली आहे. आज सकाळी ५.३० वाजेपासून मी स्वतः बाधित गावांपर्यंत पोहोचून प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधत आहे. माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांनी देखील परिस्थितीची माहिती मिळताच तात्काळ चाळीसगाव गाठत दिवसभर थांबून पूरग्रस्तांना धीर दिला. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासह जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे, पंचायत समितीचे गटनेते संजय तात्या पाटील, नगरपालिका गटनेते1 संजय रतनसिंग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह औरंगाबाद - चाळीसगाव महामार्गावरील कन्नड घाटात दरड ...