फैजपूर येथे दशामाता उत्सवाला प्रारंभ
फैजपूर येथे दशामाता उत्सवाला प्रारंभ
फैजपूर प्रतिनिधी: येथील सौ.किरणताई कोल्हे यांच्या निवासस्थानी सालाबादप्रमाणे यावर्षी देखील दशामाता उत्सवाला मोठ्या उत्साहात व भक्ती पुर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दशामाता उत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्यात येत असून कोरोनाच्या नियमांचे पालन करुन पुर्ण नऊ दिवस देवी दशामातेची स्थापना करुन भक्तीभावाने पूजा केली जाते.कोल्हे परिवारातील सदस्य गेली १८ वर्षे हा उत्सव अखंडपणे साजरा करतात. दरवर्षी श्रावण महिन्यात दहा दिवस नवरात्र स्वरुपात हा उत्सव साजरा केला जातो व अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते अशी माहिती यावेळी सौ.किरणताई कोल्हे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment