ना.राणे साहेबांना अटक हे ठाकरे सरकारचं सुडाचं राजकारण- आ.मंगेश चव्हाण
चाळीसगाव प्रतिनिधी- भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला असुन कार्यकर्ते व पदाधिकारींनी जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराज चौक व परिसर दणाणून सोडला होता.
रास्तारोको आंदोलन प्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. या राज्यात कायद्याचं राज्य राहिलेले नसुन हे सरकार कायद्याचा गैरव्यवहार करुन विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येऊन शर्जील उस्मानी सारखा देशद्रोही माणूस भारतमातेला तसेच हिंदु धर्माला शिव्या देतो तेव्हा मात्र त्याला अटक केली जात नाही.या ठाकरे सरकारमधील एक जबाबदार मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अपशब्द बोलून त्यांचा अपमान करतो तेव्हा त्याला अटक केली जात नाही.मग फक्त राणे साहेबांना का अटक केली? असा मोठा गंभीर प्रश्न यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे सरकार सुडाचं राजकारण करत आहे-आ.मंगेश चव्हाण
ठाकरे सरकार सुडाचं राजकारण करत असुन सुडभावनेनेच केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना पोलीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दबावाखाली येऊन अटक केली आहे. तसेच या अटकेनंतर देखील त्यांचे समाधान झाले नाही की काय तर शिवसेच्या कार्यकर्त्यांनी व काही पदाधिकाऱ्यांनी जळगावसह राज्यात विविध ठिकाणी भाजपाच्या कार्यालयांवर हल्ला केला आहे. मग ही शिवसेनेची संस्कृती आहे का? असा सवाल यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
या आंदोलन प्रसंगी तालुकाध्यक्ष प्रा.सुनिल निकम, सरचिटणीस धनंजय मांडोळे,शहर सरचिटणीस अमोल नानकर, युवा मोर्चा अध्यक्ष भावेश कोठावदे यांनी मनोगतातून आघाडी सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, सरचिटणीस योगेश खंडेलवाल, अमोल चव्हाण ,न पा गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक नितीन पाटील, सोमसिंग राजपूत, चंद्रकांत तायडे,विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल नागरे,जिप सदस्य अनिल गायकवाड,सदानंद चौधरी, कैलास चव्हाण, निवृत्त कवडे,धर्मराज बच्छे, ज्ञानेश्वर बागुल,आयास पठाण,तुषार बोतरे,संदिप पाटील, रणजित पाटील, दिपकसिंग राजपूत, संदिप गवळी,सोमनाथ चौधरी,राकेश बोरसे,डाॅ रविन्द्र मराठे,सुनिल पवार, डी एस मांळे,प्रल्हाद महाजन,विजय पाटील, मनोज गोसावी,राम पाटील, विशाल सरदारसिग पाटील, सिध्दांत पाटील, जगदीश चव्हाण, निलेश जाधव,आदित्य महाजन,विवेक चौधरी,प्रभाकर चौधरी,सचिन आव्हाड यांच्यासह मोठ्याप्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment