भाजपा जळगाव जिल्हा वतीने राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियान कार्यशाळा संपन्न
जळगाव प्रतिनिधी: कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याच काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आ.गिरीषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली केलं आहे, सेवा हेच संघटन हे तत्व अवलंबून रुग्णसेवा करणाऱ्या सर्व भाजपा कार्यकर्त्यांचा व सर्व वैद्यकीय आघाडीच्या सभासदांचा मला अभिमान वाटतो असे गौरव उद्गार भाजपा जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे यांनी काढले.
या कार्यशाळेत करोना प्रतिबंध व उपचार, लसीकरण, लक्षणे व आजार, करोनाची तिसरी लाट आदी विषयांवर डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ, दर्शन शहा, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नि. तू पाटील, डॉ. लीना पाटील आदी तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर भाजप जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. स्मिता वाघ, महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष तथा नगरसेविका उज्वला बेंडाळे, वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तू पाटील, माजी जि. प अध्यक्ष प्रयागताई कोळी, वैद्यकीय आघाडीचे ग्रामीण संयोजक डॉ. नरेंद्र ठाकूर, वैद्यकीय आघाडीचे महानगर संयोजक डॉ. धर्मेंद्र पाटील, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, नितीन इंगळे, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment