भाजपा चाळीसगाव तालुका वैद्यकीय आघाडी अध्यक्षपदी डॉ रविंद्र मराठे, सरचिटणीसपदी डॉ.प्रशांत एरंडे, उपाध्यक्षपदी डॉ.डी.टी.पाटील
डॉ.प्रशांत एरंडे तालुका सरचिटणीसपदी तर डॉ.डी.टी.पाटील तालुका उपाध्यक्षपदी नियुक्त
चाळीसगाव प्रतिनिधी: तालुक्यातील तरवाडे येथील डॉ.रविंद्र मराठे यांची चाळीसगाव भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष पदी, डॉ.प्रशांत पंडीत एरंडे खरजई यांची वैद्यकीय आघाडी चाळीसगांव तालुका सरचिटणीसपदी व डॉ. डी.टी.पाटील सायगाव यांची वैद्यकीय आघाडी चाळीसगाव तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपा कार्यालय जळगाव येथे आ.राजुमामा भोळे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या "वसंत स्मृती" जळगाव या कार्यालयात पार पडला. सदर प्रसंगी जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील,माजी आ.स्मिताताई वाघ,महानगर अध्यक्ष दिपकभाऊ सूर्यवंशी, सर्व सरचिटणीस ,उत्तर महाराष्ट्र भाजप वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.श्री.प्रशांत पाटील,सहसंयोजक डॉ.नितु पाटील, वैद्यकीय आघाडी जिल्हा संयोजक डॉ.नरेंद्र ठाकूर, महानगर संयोजक डॉ.श्री.धर्मेंद्र पाटील, कार्यालय प्रमुख गणेश माळी आदी उपस्थित होते.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते आ.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे जळगाव, खा. उन्मेष दादा पाटील,जळगाव,आमदार मंगेशदादा चव्हाण,चाळीसगाव तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर चाळीसगाव यांनी अभिनंदन केले आहे आणि पक्ष कार्यासाठी व विस्तारासाठी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment