Posts

Showing posts from May, 2022

खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन आणि स्मार्ट चॉईस यांच्या वतीने आरोग्यविषयक मार्गदर्शन

Image
  फैजपूर प्रतिनिधी: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर आणि स्मार्ट चॉईस सॅनिटरी नॅपकिन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपूर येथे महिला व मुलींना मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.       यावेळी मुंबई येथील स्मार्ट चॉईस च्या आरोग्य सल्लागार सौ.माधुरी पाटील नारखेडे यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी, त्यादरम्यान स्वच्छता कशी ठेवावी तसेच सॅनिटरी नॅपकिन कोणते वापरावे, बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सॅनिटरी नॅपकिन विषयी सखोल मार्गदर्शन यावेळी माधुरी पाटील नारखेडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी सांगितले की महिला या कुटुंबाचा महत्वाचा आधारस्तंभ आहेत; कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतांनाच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः मासिक पाळी संदर्भात महिलांनी जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यासंदर्भात उद्भवणाऱ्या विविध आजारांवर महिलांन...

कुंझर येथील हर्षल गोसावी ला सुवर्ण पदक

Image
    चाळीसगाव प्रतिनिधि : कूंझर ता चाळीसगाव येथील रहिवासी ची हर्षल सतिष गोसावी याने युथ गेम  फेडरेशन ऑफ इंडीया इंटर नशनल बॉक्सिंग चॅम्पियन शिप इव्हेंट मध्ये नेपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल मिळून आपल्या देशाचे नाव उज्वल केले आहे तरी त्यास त्याचे प्रशिक्षक नील भाई याचे व वडील सतिष गोसावी काका राजेंद्र गोसावी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले व त्यास नेपाळ जाण्यासाठी ताती थय्या गुजरात या गावाचे सरपंच सौ जिजिषा भेन व पल्साना येथील प्रतिष्ठित व्यापारी निलेश देसाई यांनी हर्षल यास आर्थिक मदत केली तरी त्याचे कुंजर गावासह परिसरात पेडे वाटून अभिनंदन करण्यात येत

फैजपूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन वतीने अभिवादन

Image
  फैजपूर प्रतिनिधी: बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सौ.दिपाली चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली आणि मनोगत व्यक्त केले.      याप्रसंगी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासह शशिकला चौधरी, आशा राणे, प्रणिता पाटील, मंगला नारखेडे, रुख्मिणी नारखेडे, नलिनी नारखेडे, रजनी चौधरी, प्रशांती इंगळे, लता नारखेडे, पारस  चौधरी, पारस पाटील, पार्थ झोपे, गुनेश्री झोपे,योशिता चौधरी, रिद्धी पाटील इ. उपस्थित होते.

महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष पदी सौ.मनिषाताई पाटील यांची निवड

Image
  जळगाव प्रतिनिधी: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पर्यावरण सखी मंच च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ.मनिषाताई किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.           सौ.मनिषा पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्यासंबंधी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रमोददादा मोरे आणि महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्षा श्रीमती प्रियंवदाताई तांबोटकर यांनी ही निवड केली आहे.या निवडीबद्दल सौ.मनिषाताई यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

वृक्षसंवर्धन समिती आणि नारीशक्ती गृपने दिले उष्णतेमुळे जळणाऱ्या रोपांना जीवदान

Image
    जळगाव प्रतिनिधी: महामार्ग चौपदरी करण करताना अनेक मोठी वृक्ष तोडावी लागली होती ही वृक्ष तोडल्या नंतर रस्त्याच्या काम पूर्ण झाल्यावर पुन्हा नव्याने वृक्ष लावण्याची अट ठेकेदाराला असल्याने त्याने हजारो रोपटे रस्त्याच्या दुतर्फा लावली आहेत,मात्र वाढत्या उष्णतेच्या लाटेत ही रोपटी जागविण्या साठी त्यांना नियमित पाणी देणे गरजेचे आहे मात्र याकडेच ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने लागवड केलेल्या हजारो झाडातील चाळीस टक्के रोप ही जळून गेल्याच समितीच्या पाहणीत आढळून आले आहे उष्णतेच्या लाटेची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता असल्याने अजूनही मोठ्या संख्येने रोप जळण्याचे मार्गावर असल्याने शहरातील पर्यावरण संरक्षण साठी काम करणाऱया वृक्ष संवर्धन समिती आणि नारीशक्ती ग्रुप चे संयुक्त विद्यमाने पाण्या अभावी जळणाऱ्या रोपांना पाणी देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहीमे अंतर्गत काल महामार्गालगत असलेल्या देशी विदेशी प्रजातीच्या सातशे रोपत्यांना श्रमदान करून पाणी देऊन जीवदान देण्यात आले आहे या उपक्रमासाठी महापौर जयश्री महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमात...

नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी वतीने कामगार दिनी हमाल बांधवांना मिल्टान पाण्याची बाटली व रुमाल वाटप

Image
  जळगाव प्रतिनिधी: ०१ मे महाराष्ट्र  दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मे रोजी संध्याकाळी ५:०० वाजता जळगाव पीपल्स बँक दाणा बाजार येथे दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या कामगारांना, वाढते तापमान त्यातच पोटापाण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हमाल कामगार कसलीच पर्वा न करता श्रमदेवतेची उपासना करतात. अशा वेळीं भर उन्हात तहान भागवण्यासाठी त्यांना मिल्टान थंड पाण्याची बाटली व रुमाल वाटप महापौर जयश्रीताई महाजन व अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.        यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी या प्रसंगी हमाल तसेच कामगाराबद्दल अभिमान व्यक्त केला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव सदस्या भाग्यश्री महाजन, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, शशी शर्मा, नूतन तासखेडकर, आशा मौर्या, वैशाली शिरुडे, उल्का पाटे, निशा चौधरी उपस्थित होते.