खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन आणि स्मार्ट चॉईस यांच्या वतीने आरोग्यविषयक मार्गदर्शन
फैजपूर प्रतिनिधी: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर आणि स्मार्ट चॉईस सॅनिटरी नॅपकिन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने फैजपूर येथे महिला व मुलींना मासिक पाळी, स्वच्छता व आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी मुंबई येथील स्मार्ट चॉईस च्या आरोग्य सल्लागार सौ.माधुरी पाटील नारखेडे यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी, त्यादरम्यान स्वच्छता कशी ठेवावी तसेच सॅनिटरी नॅपकिन कोणते वापरावे, बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सॅनिटरी नॅपकिन विषयी सखोल मार्गदर्शन यावेळी माधुरी पाटील नारखेडे यांनी सखोल मार्गदर्शन केले. यावेळी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी सांगितले की महिला या कुटुंबाचा महत्वाचा आधारस्तंभ आहेत; कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असतांनाच महिलांनी स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. विशेषतः मासिक पाळी संदर्भात महिलांनी जास्तीत जास्त स्वतःची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यासंदर्भात उद्भवणाऱ्या विविध आजारांवर महिलांना मात करता येईल.महिला या भारतीय कुटुंबव्यवस्थेचा महत्वाचा कणा असून महिला सुदृढ असेल तर निश्चितच देश सुदृढ होईल असं मत यावेळी सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी, स्मार्ट चॉईस च्या सौ.माधुरी पाटील नारखेडे यांच्यासह सौ.नलीनी नारखेडे, सौ.सुनंदा नारखेडे,सौ. रजनी चौधरी, श्रीमती शशिकला चौधरी, सौ.वैशाली बाक्क्षे,सौ.पुजा नाईक, कु.गुणेश्री झोपे आणि महिला व मुली उपस्थित होत्या.

Comments
Post a Comment