फैजपूर येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन वतीने अभिवादन

 




फैजपूर प्रतिनिधी: बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन फैजपूर वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सौ.दिपाली चौधरी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याची माहिती दिली आणि मनोगत व्यक्त केले.


     याप्रसंगी खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासह शशिकला चौधरी, आशा राणे, प्रणिता पाटील, मंगला नारखेडे, रुख्मिणी नारखेडे, नलिनी नारखेडे, रजनी चौधरी, प्रशांती इंगळे, लता नारखेडे, पारस  चौधरी, पारस पाटील, पार्थ झोपे, गुनेश्री झोपे,योशिता चौधरी, रिद्धी पाटील इ. उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व