वृक्षसंवर्धन समिती आणि नारीशक्ती गृपने दिले उष्णतेमुळे जळणाऱ्या रोपांना जीवदान
जळगाव प्रतिनिधी: महामार्ग चौपदरी करण करताना अनेक मोठी वृक्ष तोडावी लागली होती ही वृक्ष तोडल्या नंतर रस्त्याच्या काम पूर्ण झाल्यावर पुन्हा नव्याने वृक्ष लावण्याची अट ठेकेदाराला असल्याने त्याने हजारो रोपटे रस्त्याच्या दुतर्फा लावली आहेत,मात्र वाढत्या उष्णतेच्या लाटेत ही रोपटी जागविण्या साठी त्यांना नियमित पाणी देणे गरजेचे आहे मात्र याकडेच ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने लागवड केलेल्या हजारो झाडातील चाळीस टक्के रोप ही जळून गेल्याच समितीच्या पाहणीत आढळून आले आहे
उष्णतेच्या लाटेची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता असल्याने अजूनही मोठ्या संख्येने रोप जळण्याचे मार्गावर असल्याने शहरातील पर्यावरण संरक्षण साठी काम करणाऱया वृक्ष संवर्धन समिती आणि नारीशक्ती ग्रुप चे संयुक्त विद्यमाने पाण्या अभावी जळणाऱ्या रोपांना पाणी देण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या मोहीमे अंतर्गत काल महामार्गालगत असलेल्या देशी विदेशी प्रजातीच्या सातशे रोपत्यांना श्रमदान करून पाणी देऊन जीवदान देण्यात आले आहे
या उपक्रमासाठी महापौर जयश्री महाजन आणि आमदार सुरेश भोळे यांनी पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहे.
या उपक्रमात नारीशक्ती ग्रुप च्या अध्यक्षा मनिषा पाटील,सेवाधर्म परिवाराचे आणि वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर नेवे,डॉ हेमंत पाटील,संजय साळुंखे,कविता पाटील,रेणुका हिंगु,शशी शर्मा,योगिता बाविस्कर डी.बी.साळुंखे,भाग्यश्री महाजन,गणेश महाजन,मनपा कर्मचारी मोहन भाक्रे,निवांत इंगळे,गौरी महाजन,सौ सिमा वाघ , ओम बाविस्कर यांनी सहभाग घेतला होता

Comments
Post a Comment