नारीशक्ती बहुद्देशीय संस्था व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी वतीने कामगार दिनी हमाल बांधवांना मिल्टान पाण्याची बाटली व रुमाल वाटप

 


जळगाव प्रतिनिधी: ०१ मे महाराष्ट्र  दिन तसेच कामगार दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव व जायंटस ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ मे रोजी संध्याकाळी ५:०० वाजता जळगाव पीपल्स बँक दाणा बाजार येथे दिवसभर उन्हातान्हात कष्ट करणाऱ्या कामगारांना, वाढते तापमान त्यातच पोटापाण्यासाठी अहोरात्र कष्ट करणारे हमाल कामगार कसलीच पर्वा न करता श्रमदेवतेची उपासना करतात. अशा वेळीं भर उन्हात तहान भागवण्यासाठी त्यांना मिल्टान थंड पाण्याची बाटली व रुमाल वाटप महापौर जयश्रीताई महाजन व अध्यक्षा मनिषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.


       यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी या प्रसंगी हमाल तसेच कामगाराबद्दल अभिमान व्यक्त केला. नारीशक्ती बहुद्देशीय संस्था सदस्य व जायंट्स ग्रूप ऑफ तेजस्विनी जळगाव सदस्या भाग्यश्री महाजन, रेणुका हिंगु, योगिता बाविस्कर, शशी शर्मा, नूतन तासखेडकर, आशा मौर्या, वैशाली शिरुडे, उल्का पाटे, निशा चौधरी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व