महिला पर्यावरण सखी मंच राज्य उपाध्यक्ष पदी सौ.मनिषाताई पाटील यांची निवड
जळगाव प्रतिनिधी: निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला पर्यावरण सखी मंच च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी जळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था अध्यक्षा सौ.मनिषाताई किशोर पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
सौ.मनिषा पाटील यांनी पर्यावरण संरक्षण, संवर्धन व त्यासंबंधी केलेल्या कार्याची दखल घेऊन संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रमोददादा मोरे आणि महिला पर्यावरण सखी मंच अध्यक्षा श्रीमती प्रियंवदाताई तांबोटकर यांनी ही निवड केली आहे.या निवडीबद्दल सौ.मनिषाताई यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.


Comments
Post a Comment