विधानपरिषद पदवीधर मतदारसंघात 'हा' उमेदवार विजयी
विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत असून भाजपचा कोकणमधील जागेवर उमेदवार निवडणून आला आहे. कोकणमधून भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे हे विजयी झाले आहेत.तर औरंगाबादमध्ये मविआचे उमेदवार विक्रम काळे पहिल्या फेरीत प्रथम क्रमांकावर आहेत. नागपूर, नाशिक, अमरावती येथील निकाल येणे बाकी असून या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कात्रे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ हजारांहून अधिक मिळाल्यानंतर त्यांचा विजय पक्का झाल्याचे समजले जात होते. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा हा पहिला विजय असून कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नाशिक पदवीधरच्या जागेवर सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या निवडणूकीची चर्चा राज्यभरात गाजली त्यामुळे या जागेवर देखील कोण विजयी होणार याकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठींबा असून सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार आहेत. येथील मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसली तरी मतदार संघात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. या फलकांवर बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Comments
Post a Comment