Breaking News: 'या' आमदारांनी स्वखर्चाने सुरू केली लाखो रुपयांची शिष्यवृत्ती योजना; राज्यात प्रथमच एका लोकप्रतिनिधी कडून शिष्यवृत्ती योजना होणार लागू

           mikhandeshee.blogspot.com
शिवजयंती दिवसी आदर्शव्रत व अभिनव उपक्रम,राज्यात प्रथमच लोकप्रतिनिधीकडून शिष्यवृत्ती योजना.
आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे चाळीसगावातील विद्यार्थ्यांसाठी रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना 
----------------------------------------
१९ फेब्रुवारी शिवजयंती व रामराव जिभाऊ पाटील पुण्यतिथी रोजी मान्यवरांच्या हस्ते वितरणः 
४००  विद्यार्थ्यांना १४ लाख रूपयांची शिष्यवृत्तीचा लाभ
आमदार मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व 
----------------------------------------
चाळीसगावः परिस्थिती शिक्षणाचा डोंगर सर करतांना अडसर ठरतेचं. गुणवत्ता  असूनही आर्थिक कारणांमुळे शिक्षणाचं पाऊल थांबतं. चाळीसगाव तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील प्रतिभावान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भरारीला बळ देण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण पुढे सरसावले असून यंदापासून चाळीसगाव तालुक्याचे भाग्यविधाते 'सहकार व शिक्षण महर्षी स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या नावाने विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना त्यांनी सुरु केली आहे. 
शासना,  समाजसेवक व काही खाजगी संस्थांकडून राज्यभरात शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना दिली जात असली तरी राज्यात प्रथमच एखाद्या लोकप्रतिनिधीकडून (आमदार)शिष्यवृत्ती योजना राबविण्याचा अभिनव उपक्रम आमदार मंगेश चव्हाण यांनी सुरू केला आहे.
सदर शिष्यवृत्ती योजना अंतर्गत यावर्षीच्या निवड करण्यात आलेल्या ४०० हून अधिक पात्र विद्यार्थ्यांना जवळपास १४ लाखांची शिष्यवृत्ती वितरण करण्यात येणार आहे. दि.१९ फेब्रुवारी रोजी चाळीसगाव शहरातील वैभव मंगल कार्यालय येथे सकाळी ११ वाजता आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशीया, जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी यावर्षापासून ही शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली असून इयत्ता दहावी मध्ये किमान ८५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या व कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत यावर्षी इयत्ता ११ वी व १२ वी तसेच डिप्लोमा व आयटीआयमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. अर्ज निकष, नियम व अटी ठरविण्यासाठी २२ सदस्यीय मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली होती त्यात शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, प्राचार्य, प्राध्यापक, आदर्श शिक्षक यांचा समावेश करण्यात आला आहे.

शिवजयंती व रामराव जिभाऊ पुण्यतिथी दिनी वितरण

स्व. रामराव जिभाऊ पाटील हे चाळीसगावातील शिक्षण पंढरीचे जनक मानले जातात. त्यांच्या स्मृतींचा जागर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. रामराव जिभाऊ पाटील यांच्या जयंतीदिनी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी वैभव मंगल कार्यालय येथे आयोजित  सोहळ्यात मान्यवरांच्या व पालकांच्या उपस्थितीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश देण्यात येणार आहे. 
.....


शिक्षणाची संधी प्रत्येक विद्यार्थ्यांला मिळायला हवी. परिस्थिती शिक्षणात अडसर ठरु नये, यासाठी शिष्यवृत्ती योजना – आमदार मंगेश चव्हाण

गोरगरिब परिवातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण वाटेत हे अडथळे येतातच. मी स्वतः हा संघर्ष अनुभवला आहे. परिस्थितीचे चटकेही सोसले आहेत. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मनोभावे स्मरुन हाच चक्रव्युह भेदण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही यावर्षापासून करतोयं.आपल्या चाळीसगाव पंचक्रोशीचे सहकार व शिक्षण महर्षि स्व. रामराव जिभाऊ पाटील यांनी याच भूमीत शिक्षण आणि सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या स्मृतींचा कृतीशील जागर करतांना चाळीसगाव तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी 'स्व. सहकार व शिक्षण महर्षि रामराव जिभाऊ पाटील विद्यार्थी सन्मान शिष्यवृत्ती योजना' सुरु केली आहे. शिक्षणाची संधी प्रत्येक विद्यार्थ्यांला मिळायला हवी. परिस्थिती शिक्षणात अडसर ठरु नये, यासाठी शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याचा शब्द दिला होता. त्याची पूर्ति यावर्षापासून करीत आहे. शिक्षण मदतीचा हा यज्ञ पुढेही सुरुच राहील.

- आमदार  मंगेश चव्हाण (आमदार, चाळीसगाव.)


✒️✒️✒️✒️✒️✒️✒️
मी खान्देशी न्यूज नेटवर्क
मुख्य संपादक - संदीप पाटील 
Email - mikhandeshinews@gmail.com

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व