Posts

Showing posts from November, 2021

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट;एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन दिला पाठिंबा

Image
आमदार मंगेश चव्हाण मोदीजी यांचा "ना खाऊंगा ना खाने दुंगा" हा विचार पुढे नेत आहेत अस सांगत स्टिंग ऑपरेशनचे केले कौतुक संपावर असलेल्या चाळीसगांव एसटी डेपो कर्मचाऱ्यांची घेतली भेट  (व्हिडिओ सौजन्य-Live trend news) चाळीसगांव प्रतिनिधी - उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते नामदार श्री.प्रविण दरेकर यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी दरेकर यांनी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. दरेकर यांनी दिलेली सदिच्छा भेट व मार्गदर्शन यामुळे भाजपा उत्साह देखील दुणावला गेला आहे.  कन्नड घाटातील पोलिसांची वसुली स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून जगासमोर आणणारे आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करण्यासाठी आज सकाळी खास भेट दिली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.  याप्रसंगी त्यांनी आमदार चव्हाण यांचे कौतुक करत राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. या स्टींगमुळे भ्रष्टाचारावर वचक बसणार असून आमदार चव्हाण यांची ही बेधडक कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोद...

सावित्रीच्या लेकीसाठी नारीशक्ती धावली; गरीब कुटुंबातील मुलांना केले शैक्षणिक साहित्य वाटप

Image
  नारीशक्ती ग्रुप जळगाव व  जायंट्स ग्रूप ऑफ  तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.   जळगाव प्रतिनिधी:  विविध वृत्तपत्राांनी लक्ष्मी शिवदास मोरे हिच्या प्रेरणादायी कार्याची नुकतीच दखल घेतलेली बातमी वाचून अध्यक्षा मनीषा पाटील यांनी लक्ष्मीच्या कार्याबाबत चौकशी केली असता तिच्याकडून समजले की शासकीय आयटीआय महाविद्यालय शेजारी रस्त्यावर लाकडाच्या बेट चेंडूफळ्या बनवून उदरनिर्वाह चालवणारे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यातील मोरे कुटुंबातील कन्या नववीत शिकणारी लक्ष्मी शिवदास मोरे ही प्रेरणादायी ज्ञानदानाचे कार्य करीत आहे.         गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. अशावेळी श्रीमंत मुलांना स्मार्टफोन उपलब्ध होतात परंतु गरीब मुलांकडे असे काही साधन नसते. अशावेळी लक्ष्मीने ही बाब जाणून या कुटुंबातील 20 मुलांना ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. शैक्षणिक कार्यासाठी तिला काही शैक्षणिक साधनांची आवश्यकता होती ती साधने नारीशक्ति ग्र...

आ.मंगेश चव्हाणांच्या दणक्याने कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला;पण दोशी पोलीसांवर कारवाई कधी?

Image
अवैध वसुली करणाऱ्या पोलिसांविरुद्ध कारवाई कधी करणार? सामान्य जनतेकडून अपेक्षा चाळीसगांव प्रतिनिधी: येथून जवळच असलेल्या औरंगाबाद चाळीसगाव जोडणार्या कन्नड औट्रम घाटात काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने अवजड वाहतुकीसाठी घाट बंद करण्यात आला होता.परंतु काही दिवसांपासून घाटात ड्यूटीवर असणारे पोलिस अवैधरित्या अवजड वाहनांना ५०० ते १००० रुपये घेऊन रात्री परवानगी देत असल्याचे लक्षात आल्याने चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांनी स्वतः ट्रक ड्रायव्हर बनून स्टींग ऑपरेशन करत पोलीस डिपार्टमेंट ची पोलखोल केली.यामुळे पुन्हा एकदा पोलीस विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली असून गृहविभागाने पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या १०० कोटी वसुली चे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.         दरम्यान या आ.मंगेश चव्हाण यांच्या स्टींग ऑपरेशन मुळे गृहविभागाची वसुली पुन्हा एकदा चर्चेत आल्याने कदाचित राज्यसरकारने या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी कन्नड घाट अवजड वाहतुकीसाठी खुला करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. दोशी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी? दर...

सागरभाऊ झोडगे युवा मंच कडून भव्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन

Image
पाटणादेवी रोड चाळीसगाव येथे भव्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन सागर झोडगे युवा मंच आणि तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांचा संयुक्त उपक्रम चाळीसगाव प्रतिनिधी: येथील सागर झोडगे युवा मंच आणि तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणादेवी रोड विजय सिंग राजपूत नगर चाळीसगाव येथे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर शनिवार दिनांक 27 11 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.       या शिबिरामध्ये तज्ञांकडून कम्प्युटर दारे नेत्रतपासणी, चष्मा निश्चिती,अल्प दृष्टी दोष व त्या निगडीत मार्गदर्शन, नंबर प्रमाणे चष्मे, बिनटाक्याची देशी-विदेशी रंगाच्या साह्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तंत्रज्ञानद्वारे होणारी शस्त्रक्रिया, तिरळेपणावर असणाऱ्या शस्त्रक्रिया, लासूरची टाक्याची व बिनटाक्याची शस्त्रक्रिया, रेटिना शस्त्रक्रिया अशा अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.     ग्रामीण भागात आयोजित या शिबिरास मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची शक्यता आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणात गरज असल्यास ऑपरेशनची सुविधा सागर झोडगे मंचातर्फे...

पुन्हा राजकीय भूकंप?? शरद पवार तातडीने दिल्ली रवाना; फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत असल्याने चर्चेला उधाण

Image
पुन्हा राजकीय भूकंप?? शरद पवार तातडीने दिल्ली रवाना; फडणवीस, चंद्रकांत पाटील देखील दिल्लीत असल्याने चर्चेला उधाण मुंबई प्रतिनिधी: दोन वर्षांपूर्वी च्या पवार-फडणवीस शपथविधी च्या आठवणी ताज्या असतानाच आज राज्यात विविध घडामोडी घडतांना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. मुंबईतील सर्वच नियोजित कार्यक्रम सोडून ते दिल्लीत जात आहेत.चर्चेचा विषय म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलदेखील दिल्लीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवार राजनाथसिंहांची घेणार भेट? आपल्या दिल्ली दौऱ्यात शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. विरोधकांची बैठक असून त्यात सहभागी होण्यासाठी शरद पवार गेल्याचंही बोललं जात आहे. मात्र नेमकं कारण काय आहे हे मात्र समजू शकले नाही. दरम्यान दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी ...

राज्यातील पोलीस पुन्हा वसुलीत सक्रीय;आ.मंगेश चव्हाणांनी केलं स्टिंग ऑपरेशन

Image
आमदार मंगेश चव्हाण झाले ट्रक ड्रायव्हर, कन्नड घाटात पोलिसांनी केली पैश्यांची मागणी, मग पुढे काय झाले तुम्हीच पहा... चाळीसगाव प्रतिनिधी: महावसुली आघाडी सरकारच्या आशिर्वादाने चाळीसगाव तालुक्यातील अवजड वाहनांसाठी बंद असलेल्या कन्नड घाटात महाराष्ट्र पोलीस ट्रक चालकांकडून कशा प्रकारे पैसे वसुली करतात याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता, याची खातरजमा करण्यासाठी चाळीसगांव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन केले. त्यांनी स्वतः अजवड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली असता त्यांनी थोडे कमी करा अस सांगत ५०० रुपये पोलिसांच्या हातात दिले व बाकी पैसे परत मागितले असता सदर पोलिसाने ते देण्यास नकार दिला. नंतर ड्रायव्हर बनलेले आमदार मंगेश चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना जवळ बोलावले व हा बाकी पैसे परत देत नसल्याचे सांगितले, तेव्हा त्यातील एक पोलीस शिवीगाळ करायला लागला मग आमदार मंगेश चव्हाण यांनी खाली उतरून पोलिसांशी बोलायला सुरुवात करताच काही पोलिसांनी आमदारांना ओळखले व त्यांन...

नारीशक्ती गृप जळगाव तर्फे गरजूंना ब्लँकेट व औषधी वाटप

Image
नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे गरजूंना ब्लँकेट व औषधी वाटप जळगाव प्रतिनिधी: नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे आज दिनांक_२०/११/२०२१ रोजी अमर संस्था संचलित मानव सेवा तीर्थ वेले तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथे ब्लँकेट वाटप व औषधी वाटप करण्यात आली.वेले चोपडा येथे मानव सेवा तीर्थ येथे मनोरुग्ण, दिव्यांग तसेच रस्त्यावर अनाथ अशा व्यक्तींना आश्रय देऊन अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा भागविल्या जाऊन त्यांच्यावर औषधोपचार केला जातो. अशा लोकांची सेवा करण्यासाठी नारीशक्ती ग्रूप जळगाव यांनी पुढाकार घेऊन हिवाळ्याचे औचीत्य साधून अशा एकूण ७० गरजुंसाठी  ब्लँकेट व औषधी वाटप करण्यात आली. जळगाव महापौर जयश्रीताई महाजन यांनी औषधी उपलब्ध करून दिली.       याप्रसंगी नारीशक्ती ग्रुप जळगाव अध्यक्ष मनिषा पाटील, सुमित्रा पाटील ज्योती राणे भावना चौहान, नूतन तासखेडकर तसेच मानव सेवा तीर्थ व्यवस्थापक नरेंद्र पाटील , अजय राणा उपस्थित होते. याप्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन ,अरुणा धाडे कतार, प्रीती दोषी, नूतन तासखेडकर ,यांचे आर्थिक सहकार्य लाभले.

ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या 'ह्या' गावाला आ.मंगेश चव्हाणांनी दिला २४ लाखांचा निधी

Image
ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या बोरखेडा खुर्द गावाला दिलेला शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी पाळला, २४ लाखांच्या निधीतून स्मशानभूमी सुशोभिकरण, गावांतर्गत रस्ता व RO वाटर फिल्टर आदी विकास कामांचे भूमिपूजन संपन्न गावात जिल्हा परिषदेची शाळा आदर्श करणाऱ्या शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते सत्कार व दिवाळी निमित्ताने कपडे, फराळ वाटप बोरखेडा खुर्द – चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना प्रत्येकी २० लाख रुपये निधी विकासकामांसाठी देण्याचा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला होता. आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बोरखेडा खुर्द गावाने पक्षीय अभिनवेश, गट – तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील दिलेला शब्द पाळत पहिल्याच वर्षी बोरखेडा खुर्द गावासाठी २४ लाखांचा निधी गावाने सुचविलेल्या विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला, त्यात गावाच्या स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावांतर्गत पक्का सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी ९ लाख रुपये तसेच गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी RO जलशुद्धीकरण प्रकल्प यासाठी ५ लाख रुपये आदी काम...

धक्कादायक: ८ कोटींचा गांजा प्रकरणी जळगाव जिल्हा पुन्हा चर्चेत

Image
धक्कादायक: जळगाव कडे जाणारा ८ कोटींचा गांजा जप्त NCB ची कारवाई नांदेड प्रतिनिधी : नांदेड या महाराष्ट्राच्या सिमाभागातील जिल्ह्याच्या ठिकाणी गांजाची तस्करी करणारा एक ट्रक पकडण्यात आला आहे. विशाखापट्टनम येथून महाराष्ट्रात येत असताना नायगाव येथे NCB चे पथक आणि पोलिसांनी सोमवारी सकाळी हा ट्रक अडवला. त्यातून तब्बल 48 पोती भरून गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील सविस्तर चौकशी सुरू आहे.       NCB च्या मुंबई येथील पथकाने नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटे ही धाडसी कारवाई केली. या 48 पोत्यांमध्ये 11 क्विंटल 75 किलो गांजा सापडला असून सदर ट्रक गांजा घेवून विशाखापट्टनम येथून जळगावकडे जात असल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रकरणात ट्रक क्रमांक MH 26 AD 2165 आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे.     मुंबई NCB च्या कारवाईत सापडलेल्या या गांजाची बाजारातील किंमत जवळपास 7 ते 8 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या पथकात एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, क...

धक्कादायक: आता निलंबित महिला एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

Image
धक्कादायक: आता निलंबित एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न नाशिक प्रतिनिधी:  राज्यभरात एसटीचा संप मोठ्या प्रमाणावर रौद्र रूप धारण करत असून नाशिक मधे धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे.आंदोलन केले म्हणून कामावरून निलंबित केल्याने महिला एसटी कर्मचारीने पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशकात घडली. संप मिटत नसल्याने महाराष्ट्र शासनाने आता आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली असून आतापर्यंत जवळपास दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे.          आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला एसटी कंडक्टर असुन ताई ऐंगोडे असं त्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान यावेळी लहान बहिणीने वेळीच तत्परता दाखविल्याने सुदैवाने सदर महिला कर्मचाऱ्याचा जीव वाचला. आत्महत्या करणारी महिला कर्मचारी पंचवटी डेपोत कामाला आहे.या ठिकाणी तिला तीन महिने निलंबनाची नोटिस देण्यात आली.          महत्वाचे म्हणजे या महिलेला आई-वडील नसून लहान बहिणीची जबाबदारी देखी...

एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरुच;आज पुन्हा ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन

Image
एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय सुरुच;आज पुन्हा ५४२ कर्मचाऱ्यांचे निलंबन मुंबई प्रतिनिधी : एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची राज्य सरकारमध्ये विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. राज्य सरकारने काही अटी मान्य केल्या आहे. पण, तरीही संघटना आंदोलनावर ठाम आहे.         आता राज्य सरकारने आज 542 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची धडक कारवाई केली आहे. तर कालही 376 संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यामुळे राज्यभरात आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.         काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत आंदोलनावर गेले आहे. राज्यातील अनेक डेपो बंद आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या काळात प्रवाशांना अतोनात हाल सहन करावे लागत आहे. या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच, हायकोर्टातही या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची विनंती केली होती. पण, संघटना लेखी आश्वासनाशिवाय मागे हटण्यास तयार नाहीत.         दरम्यान एस टी कर्मचारी आपल्या मागण्यांव...

मोठी बातमी: जिल्हा बँक निवडणूकीतून भाजपच्या सर्वच उमेदवारांची माघार

Image
मोठी बातमी: जिल्हा बँक निवडणूकीतून भाजपच्या सर्व उमेदवारांची माघार जळगाव प्रतिनिधी ː- जळगाव जिल्ह्याची आर्थिक केंद्रबिंदू समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीतून आज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी च्या सर्वच उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय रंग चढला असताना मात्र आजच्या शेवटचा माघारीचा दिवस असताना भाजप नेते आ. गिरीश महाजनांसह सर्वच उमेदवारांनी माघार घेत जिल्हा बँक निवडणुकीत पीछेहाट घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीला जिल्हा बँकेत आपली सत्ता स्थापन करण्याची आयती संधी मिळाली आहे. मात्र भाजपच्या सर्वच उमेदवारांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बॅंकेत अनेक गैरव्यवहार; लवकरच सर्व घोटाळे उघडकीस आणणार-माजी मंत्री आ.गिरीश महाजन   सर्वपक्षीय पॅनल ठरलेले असतांनाच ऐन वेळेवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी युटर्न घेतल्याने कमी वेळात आम्ही अर्ज भरले. अधिकाऱ्यांवर दडपण आणल्याने आमचे अर्ज येथ...

माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या मध्यस्थीने मुंदखेडा व चितेगाव प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे

Image
माजी जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांच्या मध्यस्थीने मुंदखेडा व चितेगाव प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे दि.१० नोव्हेंबर नंतर मुंबई येथे लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आश्वासन जळगाव प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित चितेगाव, पातोंडा, मुंदखेडा,ओढरे येथील धरणग्रस्त शेतकरी कायदेशीर रित्या हायकोर्ट पर्यंत लढून जमीन मोबदला मिळावा असा आदेश सरकार पाळत नसल्याने दि.१ नोव्हेंबर पासून २५० ते ३०० शेतकरी सहपरिवार तापी विकास महामंडळ जळगाव येथे सकाळ पासून उपोषणास बसले होते. सदर उपोषण स्थळी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदार, आमदारांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की गिरिषभाऊ आपण जलसंपदा मंत्री असताना आमच्या भूसंपादनाच्या २० वर्षांपासून थकलेल्या निधींचा प्रश्न मार्गी लागला आणि त्याचा पहिला हफ्ता देखील आम्हाला मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मा.न्यायालयाने आदेश देऊन देखील महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही. शेतकऱ्यांच...