विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट;एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन दिला पाठिंबा
स्टिंग ऑपरेशनचे केले कौतुक
संपावर असलेल्या चाळीसगांव एसटी डेपो कर्मचाऱ्यांची घेतली भेट
(व्हिडिओ सौजन्य-Live trend news)
चाळीसगांव प्रतिनिधी - उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते नामदार श्री.प्रविण दरेकर यांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या शिवनेरी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली, यावेळी दरेकर यांनी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. दरेकर यांनी दिलेली सदिच्छा भेट व मार्गदर्शन यामुळे भाजपा उत्साह देखील दुणावला गेला आहे.
कन्नड घाटातील पोलिसांची वसुली स्टींग ऑपरेशनच्या माध्यमातून जगासमोर आणणारे आमदार मंगेश चव्हाण यांचे कौतुक करण्यासाठी आज सकाळी खास भेट दिली असल्याचे प्रवीण दरेकर यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी आमदार चव्हाण यांचे कौतुक करत राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले. या स्टींगमुळे भ्रष्टाचारावर वचक बसणार असून आमदार चव्हाण यांची ही बेधडक कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "ना खाऊंगा ना खाने दुंगा" हा विचार पुढे नेणारी असल्याची वाखाणणी त्यांनी केली. तर राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नसून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार हेक्टरी देण्याचे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चाळीसगांव तालुक्यातील नुकसान ग्रस्तांना 1 रुपया देखील दिला नाही, लसरकार संवेदनाहीन झाल्याचा हल्लाबोल देखील त्यांनी केला.
तद्नंतर नामदार प्रविण दरेकर यांनी चाळीसगांव आगार येथे एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेल्या संप ठिकाणी भेट दिली व त्यांच्या व्यथा समजून घेतल्या. कर्मचाऱ्यांच्या बाजूने भाजप खंबीरपणे उभा आहे. यात तडजोड होणार नाही व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या १५ दिवस सुरू असलेल्या आंदोलनाला मा.दरेकर साहेब यांनी दररोज भेट दिली, कामगारांसोबत जेवणासह ऊन, वारा, पावसात कायम साथ दिली, दरेकर साहेबांनी दिलेल्या पाठबळामुळे हे आंदोलन पुढे नेता आले व पहिल्या टप्प्यात एक मोठी पगारवाढ सरकारला जाहीर करण्यास भाग पाडले. याबद्दल चाळीसगांव एसटी कामगारांनी दरेकर यांचे आभार मानले.
Comments
Post a Comment