धक्कादायक: ८ कोटींचा गांजा प्रकरणी जळगाव जिल्हा पुन्हा चर्चेत

धक्कादायक: जळगाव कडे जाणारा ८ कोटींचा गांजा जप्त NCB ची कारवाई

नांदेड प्रतिनिधी: नांदेड या महाराष्ट्राच्या सिमाभागातील जिल्ह्याच्या ठिकाणी गांजाची तस्करी करणारा एक ट्रक पकडण्यात आला आहे. विशाखापट्टनम येथून महाराष्ट्रात येत असताना नायगाव येथे NCB चे पथक आणि पोलिसांनी सोमवारी सकाळी हा ट्रक अडवला. त्यातून तब्बल 48 पोती भरून गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणात ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असून पुढील सविस्तर चौकशी सुरू आहे.

      NCB च्या मुंबई येथील पथकाने नायगाव तालुक्यातील मांजरम येथे आज पहाटे ही धाडसी कारवाई केली. या 48 पोत्यांमध्ये 11 क्विंटल 75 किलो गांजा सापडला असून सदर ट्रक गांजा घेवून विशाखापट्टनम येथून जळगावकडे जात असल्याचे देखील बोलले जात आहे. या प्रकरणात ट्रक क्रमांक MH 26 AD 2165 आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले असून सखोल तपास सुरू आहे.
    मुंबई NCB च्या कारवाईत सापडलेल्या या गांजाची बाजारातील किंमत जवळपास 7 ते 8 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. या पथकात एनसीबीचे अधिकारी अमोल मोरे, सुधाकर शिंदे, संजय गवळी, प्रमोद मोरे, कृष्णापारमदरेकर यांचा समावेश होता.

पुन्हा गांजा प्रकरणी जळगाव जिल्हा चर्चेत...

दरम्यान या कारवाईत जळगाव चे नाव घेतले जात असून गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा अवैध धंद्यांबाबत चर्चेत तर आहेच परंतु अधून मधून मोठ्या प्रमाणावर गांजा सापडत आहे. आणि आज आणखी जवळपास आठ कोटी रुपयांचा जप्त करण्यात आलेला गांजा देखील जळगाव च्या दिशेने जात असल्याचे बोलले जात असून जर का हे खरे असेल तर तो नेमका कोणाकडे जात होता? जळगावातील तो गांजा तस्कर कोण आहे? कोणाच्या छत्रछायेखाली ही गांजा तस्करी सुरू आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पुढील तपासात लवकरच या प्रश्नांची उत्तरे NCB कडून मिळतील अशी अपेक्षा जळगाव जिल्ह्यातील जनतेला आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व