मोठी बातमी: जिल्हा बँक निवडणूकीतून भाजपच्या सर्वच उमेदवारांची माघार

मोठी बातमी: जिल्हा बँक निवडणूकीतून भाजपच्या सर्व उमेदवारांची माघार

जळगाव प्रतिनिधी ː-जळगाव जिल्ह्याची आर्थिक केंद्रबिंदू समजली जाणारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूकीतून आज माघारीच्या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी च्या सर्वच उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने सर्वच स्तरांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकीय रंग चढला असताना मात्र आजच्या शेवटचा माघारीचा दिवस असताना भाजप नेते आ. गिरीश महाजनांसह सर्वच उमेदवारांनी माघार घेत जिल्हा बँक निवडणुकीत पीछेहाट घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीला जिल्हा बँकेत आपली सत्ता स्थापन करण्याची आयती संधी मिळाली आहे. मात्र भाजपच्या सर्वच उमेदवारांनी बँकेच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बॅंकेत अनेक गैरव्यवहार; लवकरच सर्व घोटाळे उघडकीस आणणार-माजी मंत्री आ.गिरीश महाजन
  सर्वपक्षीय पॅनल ठरलेले असतांनाच ऐन वेळेवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी युटर्न घेतल्याने कमी वेळात आम्ही अर्ज भरले. अधिकाऱ्यांवर दडपण आणल्याने आमचे अर्ज येथे राहू शकले नाही. यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला म्हणून भाजपच्या उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेवून बहिष्कार टाकला आहे.
           जिल्हा बँकेत चेअरमन,व्हाईस चेअरमन आणि काही सदस्यांनी मिळून अनेक गैरव्यवहार केले असून स्वताच्या संस्थांनाच कोट्यवधींचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.ही बॅंक शेतकऱ्यांची आहे की फक्त काही संचालकांची खासगी आहे? असा प्रश्न उपस्थित करत भविष्यात या बँकेचे दूध का दूध, पाणी का पाणी होणार असे माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी सांगितले.


अगोदर सर्वपक्षीय नंतर स्वतंत्र पॅनल आणि आज माघार..

सर्व पक्षीय पॅनल मधून भाजप बाहेर पडल्यावर बँकेची निवडणूक स्वंतत्र लढण्याची घोषणा भाजप नेते आ. गिरीश महाजन यांनी केली होती. सर्वच जागांवर भाजपच्यावतीने उमेदवार देण्यात आले होते मात्र आमदार खासदार यांच्या सहा उमेदवारांचे काही उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवले होते. यावरून भाजपने कायदेशीर लढाई देखील केली मात्र त्यात भाजपला अपयश आले. गिरीश महाजन यांनी जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लावली असताना अचानक पणे निवडणुकीवर भाजपकडून बहिष्कार टाकण्यात आला आल्याने महाविकास आघाडीचे नेते देखील चक्रावले आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व