सागरभाऊ झोडगे युवा मंच कडून भव्य नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन
सागर झोडगे युवा मंच आणि तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांचा संयुक्त उपक्रम
चाळीसगाव प्रतिनिधी: येथील सागर झोडगे युवा मंच आणि तुलसी आय हॉस्पिटल नासिक यांच्या संयुक्त विद्यमाने पाटणादेवी रोड विजय सिंग राजपूत नगर चाळीसगाव येथे मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर शनिवार दिनांक 27 11 2019 रोजी सकाळी 10 ते दुपारी चार वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरामध्ये तज्ञांकडून कम्प्युटर दारे नेत्रतपासणी, चष्मा निश्चिती,अल्प दृष्टी दोष व त्या निगडीत मार्गदर्शन, नंबर प्रमाणे चष्मे, बिनटाक्याची देशी-विदेशी रंगाच्या साह्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया व तंत्रज्ञानद्वारे होणारी शस्त्रक्रिया, तिरळेपणावर असणाऱ्या शस्त्रक्रिया, लासूरची टाक्याची व बिनटाक्याची शस्त्रक्रिया, रेटिना शस्त्रक्रिया अशा अनेक सुविधा उपलब्ध राहणार आहेत.
ग्रामीण भागात आयोजित या शिबिरास मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची शक्यता आहे. यामध्ये बऱ्याच प्रमाणात गरज असल्यास ऑपरेशनची सुविधा सागर झोडगे मंचातर्फे असणार आहे या कार्यक्रमासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण तसेच भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर तात्या पाटील व तसेच भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.याप्रसंगी तुलसी आय हॉस्पिटल चे श्री कुलदीप भोसले सर यांचं रुग्णांना मार्गदर्शन होणार आहे. तरी या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन सागरभाऊ झोडगे युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment