माजी मंत्री गिरिष महाजन यांच्या मध्यस्थीने मुंदखेडा व चितेगाव प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे
माजी जलसंपदामंत्री गिरिष महाजन यांच्या मध्यस्थीने मुंदखेडा व चितेगाव प्रकल्पग्रस्तांचे उपोषण मागे
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे दि.१० नोव्हेंबर नंतर मुंबई येथे लोकप्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आश्वासन
जळगाव प्रतिनिधी - गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित चितेगाव, पातोंडा, मुंदखेडा,ओढरे येथील धरणग्रस्त शेतकरी कायदेशीर रित्या हायकोर्ट पर्यंत लढून जमीन मोबदला मिळावा असा आदेश सरकार पाळत नसल्याने दि.१ नोव्हेंबर पासून २५० ते ३०० शेतकरी सहपरिवार तापी विकास महामंडळ जळगाव येथे सकाळ पासून उपोषणास बसले होते. सदर उपोषण स्थळी राज्याचे माजी जलसंपदा मंत्री गिरिषभाऊ महाजन यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सर्व खासदार, आमदारांनी भेट दिली. शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की गिरिषभाऊ आपण जलसंपदा मंत्री असताना आमच्या भूसंपादनाच्या २० वर्षांपासून थकलेल्या निधींचा प्रश्न मार्गी लागला आणि त्याचा पहिला हफ्ता देखील आम्हाला मिळाला. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मा.न्यायालयाने आदेश देऊन देखील महाविकास आघाडी सरकारने एक रुपया सुद्धा आम्हाला दिला नाही. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गिरिषभाऊ महाजन यांनी थेट जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना फोन केला व शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून जोपर्यंत त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत ते उपोषणावर ठाम आहेत. एन दिवाळीत शेतकऱ्यांवर आमरण उपोषणाला बसण्याची वेळ येणार असेल व शासन त्यांच्याकडे लक्ष देत नसेल तर आम्ही देखील इथून हलणार नसल्याचे गिरिषभाऊ महाजन यांनी मंत्री जयंत पाटील यांना सांगितले. तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिवाळी सुट्या संपल्यानंतर दि.१० ते १५ नोव्हेंबर दरम्यान गिरिषभाऊ महाजन व जिल्हयातील खासदार, आमदार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी यांच्यासह बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले व तात्काळ तापी पाटबंधारे चे अधिक्षक अभियंता यांनीदेखील तसे लेखी पत्र दिल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. शेतकऱ्यांच्या हितासाठी माजी जलसंपदा मंत्री यांनी धावून येत विद्यमान जलसंपदा मंत्री यांच्याशी संवाद साधून मध्यस्थी केल्याने दिवाळीच्या सणाच्या वेळी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आमरण उपोषण टळले.गिरिषभाऊ यांनी शेतकरी बांधवांना दिवाळीसाठी घरी जा, आम्ही बैठकीत तोडगा काढू व पुढेही आम्ही सोबत आहोत असे आश्वस्त केले.
आमदार मंगेश चव्हाण यांचा पाठपुरावा...
तत्पूर्वी पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करणार असल्याचं निवेदन आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह चाळीसगांव तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी यांना दिले होते.
दिवाळी असल्याने शेतकरी यांची हाल अपेष्टा होऊ नये म्हणून आमदार मंगेश दादा यांनी लघु पाटबंधारे विभाग येथील अधिकारी यांना चाळीसगाव येथे बोलवून दि.२८ ऑक्टोबर रोजी दोन तास बैठक घेऊन सोय करा नाहीतर १ तारखेला मी स्वतःही उपोषण करेल असे सांगितले.तसेच जिल्हाधिकारी जळगाव, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री यांना यांना पत्र देऊन मोबदल्याची सोय करावी अशी विनंती केली जर उपोषणाने काही मार्ग निघाला नाही तर मी स्वतः आणि सर्व शेतकरी मुंबई ला जाऊन पैसे काढूनच देईल असे आश्वासनही आमदार चव्हाण यांनी दिले होते.
पालकमंत्र्यांचा उपोषणाकडे कानाडोळा तर उपोषण संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची धावाधाव...
शेतकरी उपोषणास बसले असता २ वाजेच्या सुमारास पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शेतकऱ्यांच्या समोरून जाताना बॅनर वाचून पुढे निघून गेले, साधा शिपाई सुध्दा शेतकऱ्यांना विचारायला संध्याकाळ पर्यंत आला नाही, फक्त अधिकारी यांनी तुम्ही म्हाताऱ्या लोकांना आणि महिलांना घरी पाठवा एवढेच सांगितले. तद्नंतर संध्याकाळी गिरिषभाऊ महाजन यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर धावाधाव करत जळगाव जिल्हयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी उपोषणकर्ते शेतकरी यांना भेट दिली.
Comments
Post a Comment