धक्कादायक: आता निलंबित महिला एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
नाशिक प्रतिनिधी: राज्यभरात एसटीचा संप मोठ्या प्रमाणावर रौद्र रूप धारण करत असून नाशिक मधे धक्कादायक घटना घडली असल्याचे समोर आले आहे.आंदोलन केले म्हणून कामावरून निलंबित केल्याने महिला एसटी कर्मचारीने पाचव्या मजल्यावरुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना नाशकात घडली. संप मिटत नसल्याने महाराष्ट्र शासनाने आता आंदोलनात सहभागी एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली असून आतापर्यंत जवळपास दोन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे.
आत्महत्येचा प्रयत्न करणारी महिला एसटी कंडक्टर असुन ताई ऐंगोडे असं त्या महिला कर्मचाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान यावेळी लहान बहिणीने वेळीच तत्परता दाखविल्याने सुदैवाने सदर महिला कर्मचाऱ्याचा जीव वाचला. आत्महत्या करणारी महिला कर्मचारी पंचवटी डेपोत कामाला आहे.या ठिकाणी तिला तीन महिने निलंबनाची नोटिस देण्यात आली.
महत्वाचे म्हणजे या महिलेला आई-वडील नसून लहान बहिणीची जबाबदारी देखील या महिलेवरच आहे. आता पगार जर नाही मिळाला तर जगायचं कसं? या विवंचनेतून या एस टी कर्मचारी महिलेने हे टोकाचे पाऊल उचललं असल्याचे याबाबत एका सुसाईड नोट मधे म्हटले आहे.
Comments
Post a Comment