ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या 'ह्या' गावाला आ.मंगेश चव्हाणांनी दिला २४ लाखांचा निधी

ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या बोरखेडा खुर्द गावाला दिलेला शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी पाळला,

२४ लाखांच्या निधीतून स्मशानभूमी सुशोभिकरण, गावांतर्गत रस्ता व RO वाटर फिल्टर आदी विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

गावात जिल्हा परिषदेची शाळा आदर्श करणाऱ्या शिक्षकांचा आमदारांच्या हस्ते सत्कार व दिवाळी निमित्ताने कपडे, फराळ वाटप

बोरखेडा खुर्द – चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना प्रत्येकी २० लाख रुपये निधी विकासकामांसाठी देण्याचा शब्द आमदार मंगेश चव्हाण यांनी दिला होता. आमदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बोरखेडा खुर्द गावाने पक्षीय अभिनवेश, गट – तट बाजूला ठेवून ग्रामपंचायत बिनविरोध केली होती. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील दिलेला शब्द पाळत पहिल्याच वर्षी बोरखेडा खुर्द गावासाठी २४ लाखांचा निधी गावाने सुचविलेल्या विकासकामांसाठी उपलब्ध करून दिला, त्यात गावाच्या स्मशानभूमी सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावांतर्गत पक्का सिमेंट रस्ता तयार करण्यासाठी ९ लाख रुपये तसेच गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी RO जलशुद्धीकरण प्रकल्प यासाठी ५ लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे. या सर्व कामांचे भूमिपूजन व उद्घाटन आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पोपट तात्या भोळे, पंचायत समिती सदस्य सुभाषदादा पाटील, सरपंच वर्षा संदीप पाटील, धनंजय चव्हाण, युवा मोर्चा पदाधिकारी जितेंद्र नेरकर, पोलीस पाटील शरद पाटील, उपसरपंच संदीप रामदास पाटील, रामकृष्ण दयाराम पाटील, सुदाम दादा पाटील, अनिलभाऊ पाटील, सुधाकर भाऊ पाटील, प्रदीप सर, शरद माळी, साहेबू दादा, सुरेश अण्णा पाटील, संघाचे पूर्णवेळ प्रचारक राजेंद्र पाटील, गोरख रामदास पाटील, अर्जुन सीताराम पाटील, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका शुक्ला ताई यांच्यासह ग्रामस्थ मंडळी आदी उपस्थित होते. 
तसेच गावात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम राबवले व याचा परिणाम शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर झाला असून पंचक्रोशीतील दर्जेदार शिक्षण देणारी शाळा म्हणून बोरखेडा खुर्द येथील शाळेला ओळख मिळाली आहे. शाळेला आदर्श शाळेचा दर्जा मिळवून देणाऱ्या शिक्षकांचा देखील गावाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शाळेतच शिक्षण देणाऱ्या श्रीमती शुक्ला मॅडम यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त फराळ व कपडे भेट देण्यात आले, त्याचे देखील वाटप आमदार चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, गाव एक झाल्याने काय घडू शकते याचे एक चांगले उदाहरण म्हणून बोरखेडा खुर्द गाव पुढे आले आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येत ग्रामपंचायत बिनविरोध केली, त्यामुळे लाखोंची विकासकामे पहिल्याच वर्षी होत आहेत, गावात खेळीमेळीचे वातावरण असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम इतर बाबींवर देखील होतो. गावाच्या एकीमुळेच शिक्षकांना देखील शाळा आदर्श करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले असून येणाऱ्या काळात देखील गावाच्या मागणीनुसार विकासकामे, योजना राबवू असे आश्वासन आमदार चव्हाण यांनी दिले.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व