ओबीसी नेते स्व.गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त कपडे वाट
ओबीसी नेते माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व.गोपिनाथराव मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप व खान्देश नारीशक्ती तर्फे फैजपूर येथे कपडे व खाऊ वाटप फैजपूर प्रतिनिधी: भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री व ओबीसी नेते स्व.गोपिनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथे भारतीय जनता पार्टी व खान्देश नारीशक्ती गृप तर्फे लहान बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. भाजपा कार्यकर्त्या व खान्देश नारीशक्ती गृप अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या हस्ते झोपडपट्टी परीसरातील लहान बालकांना नवे कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले.स्व.गोपिनाथ मुंडे साहेब यांच्या सारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्यांनी भाजप चे विचार ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहचवून पक्षाची बहुजनांचा पक्ष अशी ओळख निर्माण करण्यात मोलाचा वाटा होता असे प्रतिपादन नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी यांनी केले.स्व.गोपिनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळेच आज भाजपा पक्ष हा ओबीसींना जवळचा पक्ष वाटतो असे मत भाजप शहर सरचिटणीस संजय भावसार यांनी व्यक्त केले.झोपडीत राहणार्या बालकांना कपडे तसेच खाऊचे वाटप करुन गरीबांच्या झोपडीत आनंद न...