Posts

Showing posts from December, 2021

जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा

Image
जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा जळगाव प्रतिनिधी: जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा हा व्यसनाला आळा घालणारा उपक्रम दिनांक ३१/१२/२०२१ शुक्रवार रोजी शिव कॉलनी स्टॉप जळगाव येथे ठीक ४:०० वाजता आयोजीत करण्यात आला यावेळी समाजसेविका भारती कुमावत यांनी व्यसनांना बळी न पडता दारू ऐवजी दूध घेतले तरं आरोग्यासाठी हितकारक ठरेल व कुटूंब परिवार देखील आनंदी राहील.          तर अध्यक्ष मनिषा पाटील यांनी सांगितले की आज ३१ डिसेंबर सर्व पुरुष वर्गाने घरी दुधाचे पदार्थ नेऊन आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करावा.तसेच उपस्थित पुरुष वर्गाला प्रत्येकाने किमान पाच जणांना हा मोलाचा संदेश देऊन २०२१ सालासाठी उत्कृष्ट कार्य करून सरत्या वर्षाला निरोप द्यावा. व नवीन वर्षात चांगले संकल्प करावेत. याप्रसंगी प्रत्यक्ष दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले तर आभार नूतन तासखेडकर  यांनी मानले.यासाठी नेहा जगताप, पुष्पा...

स्वताच्या वडीलांचे पुतळे बसवले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला नाही;आ.मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहरात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण

Image
स्वताच्या वडीलांचे पुतळे बसवले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला नाही;आ.मंगेश चव्हाण चाळीसगाव शहरात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण चाळीसगाव प्रतिनिधी: गेल्या शेकडो वर्षांपासून सत्ता असलेल्यांमनी चाळीसगाव शहरात स्वताच्या बापाचे आणि आजोबांचे पुतळे बसवले परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम कायम बाजूला ठेवले असा घणाघात आ.मंगेश चव्हाण यांनी आज केला आहे.          चाळीसगाव येथे गेली अनेक दशके वर्षे प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज,माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौक सिग्नल पॉइंट चाळीसगाव येथे करण्यात आले.      याप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात का.उन्...

'पद्मश्री' पुरस्कार माझ्या काळ्या आईचा, बीयांचा आणि समाजाचा -राहीबाई पोपरे: राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले मत

Image
'पद्मश्री' पुरस्कार माझ्या काळ्या आईचा, बीयांचा आणि समाजाचा -राहीबाई पोपरे राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलनाच्या समारोपप्रसंगी व्यक्त केले मत राळेगणसिद्धी : पद्मश्री पुरस्कार माझा नसून काळ‌्या मातीचा, माझ्या बीयांचा, निसर्गाचा आणि आपल्या समाजाचा आहे. मागील २५ वर्षांपासून देशी बीया घरी जतन करत असल्याचे त्या म्हणाल्या. याबाबतची माहिती जगाला व्हावी म्हणून बायफ संस्थेची मोठी मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. गावपातळीवर कळसुबाई समिती स्थापन झाली असून सध्या संस्थेच्या सहाय्याने ३ हजार महिलांसोबत हे काम सुरू आहे. ज्या प्रकारे गावरान बीज बँक अहमदनगर जिल्ह्यात झाली आहे अशाचप्रकारे गावोगावी अशा बीज बँका निर्माण व्हाव्यात, अशी अपेक्षा पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई पोपरे यांनी व्यक्त केली. राळेगणसिद्धी येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्यस्तरीय पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, ‘ वी सिटीझन्स’चे संस्थापक पराग मते, नदीजोड प्रकल्पाचे समन्वयक राज देशमुख, मंडळाच...

सरकार हरवले आहे म्हणत चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाणांनी राज्य सरकारवर डागली तोफ

Image
  सरकार हरवले आहे म्हणत चाळीसगावचे आ.मंगेश चव्हाणांनी राज्य सरकारवर डागली तोफ 'सरकार हरवले आहे' प्रिंट केलेला कुर्ता घालून वेधले लक्ष; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर केले आंदोलन मुंबई प्रतिनिधी :   'सरकार हरवले आहे' असं प्रिंट असलेला कुर्ता घालून चाळीसगांव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी सोमवारी विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर 'ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, mpsc नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे  प्रिंट केलेले असून या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली.        दोन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी राज्य अधिवेशन पुन्हा सुरू झाले आहे. त्यातच विधानसभाध्यक्षांची निवडणूक घेण्याची शक्यता असल्याने राजकीय वातावरण तापले होते आणि यातच भाजपने आक्रमक पवित्रा घेत अधिवेशन सुरू होण्याच्या आधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले होते.           ...

श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे: राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलन उद्घाटनप्रसंगी केले प्रतिपादन

Image
श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा -ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे राळेगणसिद्धी येथे पर्यावरण संमेलन उद्घाटनप्रसंगी केले प्रतिपादन राळेगणसिद्धी : 'सच की नाव डुबती नही है ।' देशातील सनदी अधिकाऱ्यांनी ठरवलं हा देश बदलायला वेळ लागणार नाही. कोणत्याही सरकारच्या अधिकारात फक्त बदली करणे आहे आणि अधिकारी बदलीला घाबरतात. अशा वातावरणात चांगले अधिकारी काम करताना दिसतात हा एक आशेचा किरण आहे. हे चित्र पाहिल्याने आपल्याला एक पाऊल पुढं टाकण्याची शक्ती मिळाली आहे. या संमेलनाच्या व्यासपीठावरून 'जे  श्रवण केलंय ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करा' अशी सूचना ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ.अण्णा हजारे यांनी केली. राळेगणसिद्धी येथे सुरु असलेल्या निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याच्या पाचव्या दोन दिवसीय पर्यावरण संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी हजारे पुढे म्हणाले, या संमेलनाला सांगलीचा एक तरुण, पुण्यातील काही तरुण सायकलने पर्यावरणाचा संदेश देत आले, हे कौतुकास्पद आहे.  स्व.आबासाहेबांचे काम पुढे सुरु राहण्यासाठी आपण सर्वांनी प...

गुलाबराव पाटलांची मंत्रीपदावरुन तत्काळ हकालपट्टी करा- चित्रा वाघ

Image
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री व भाजपा खा.हेमा मालीनी यांच्यावर शेरेबाजी करत एका महिलेचा विनयभंग केला असून त्यांची मंत्रीमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा अशी आक्रमक मागणी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. जळगाव प्रतिनिधी: सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका करतांना तेथील रस्त्यांची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांसोबत करतांना जाहीरपणे म्हटले होते की,   "माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमामालिनी च्या गालांसारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देऊन टाकेल" आणि आता या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याची सुरुवात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ? गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील .. शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्...

बैलगाडा शर्यत शौकीनांनी केला आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी जल्लोष

Image
गुलाल भंडारा उधळत बैलगाडा शर्यत शौकीनांनी केला आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी जल्लोष... उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या भव्य बैलगाडा मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार मंगेश चव्हाण यांचा केला सत्कार आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात केले जाणार बैलगाडा शर्यतीचे आयोजन, चाळीसगाव - मा.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्याने शेतकरी, शर्यतप्रेमींमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगांव येथे देखील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा काढून तालुक्यातील बैलगाडा मालक,चालक तसेच शौकिनांनी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. आज चाळीसगाव तालुक्यातील सर्व बैलगाडा चालक, मालक,शर्यत शौकीन यांनी बैल, घोडे यासह वाजत गाजत येत आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या शिवनेरी निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांनी बैलांची पूजा केली. नंतर तेथे उपस्थित बैलगाडा प्रेमी यांनी गु...

महिला पतंजली योग समिती व जायंटस ग्रूप तेजस्विनी तर्फे मातोश्री आनंदाश्रमात (वृद्घाश्रम) योग शिबिराची सांगता

Image
महिला पतंजली योग समिती व जायंटस ग्रूप तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम(वृद्घाश्रम) येथे  योग शिबिराची सांगता जळगाव प्रतिनिधी: दिनांक 10/12/ 2021 ते दिनांक 16/12/2021 या कालावधीत पतंजली योग समिती व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम(वृद्धाश्रम) येथे योग शिबिर घेण्यात आले. यात हिवाळा या ऋतूत वयोमानाने घ्यावयाचे व्यायाम प्रकार योग प्राणायाम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सात दिवसाच्या या वर्गात विविध विषयांवर तज्ज्ञ व शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आज दिनांक 16/12/2021 रोजी राज्य कार्यकारणी सदस्य महानंदाताई पाटील यांनी मुद्रा, ॲक्युप्रेशर प्रकार यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या सुरेल भजनाने सुरुवात करण्यात आली.       या प्रसंगी प्रकल्प प्रमुख मा संजय काळे यांचे स्वागत करण्यात आले. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी आजी-आजोबांना हास्यासन, श्वानासन, व सिंहासन इत्यादी आसने घेण्यात आली. या सर्वांच्या सक्रिय सहभाग घेतला गेला. याप्रसंगी भुसावळ य...

मातोश्री वृद्धाश्रमात योग शिबिराचे आयोजन; महिला पतंजली योग समिती व जायंटस गृप ऑफ तेजस्विनी चा स्तुत्य उपक्रम

Image
ऋतू हिवाळा आरोग्य सांभाळा यासाठी मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथील आजी आजोबांसाठी सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन जळगाव प्रतिनिधी:   जळगाव येथील महिला पतंजली योग समिती व जायंटसग्रूप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबांसाठी दिनांक १०/१२/२०२१ ते १६/१२/२०२१ पर्यंत योग शिबिर आयोजित करण्यात आले असुन योगशिबिराचे दिप्प्रज्वलन व उद्घाटन ९६ वर्षीय मांडवगडे यांच्या शुभ हस्ते व आजी आजोबा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षा मनिषा पाटील यांनी प्रकल्प सह प्रमुख संजय काळे यांचे स्वागत केले. योगासाठी सर्वांग सुंदर काळ ठरणारा हिवाळा व वाढणारी थंडी पाहता शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यास मार्गदर्शन करण्यासाठी हा सात दिवसाचा वर्ग वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्यासाठी आयोजित केला. वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपले स्वास्थ कोणत्या योग व्यायामप्रकार करून या वयात साधता येईल याचे मार्गदर्शन यात करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी आजी आजोबांनी हास्यासन करतांना मनसोक्त हसण्याचा आनंद घेतला. योगामध्ये भस्रिका, कपालभाती, अनुलोम व...

आता बिना सुईची कोरोना लस; जळगावमध्ये लवकरच लसीकरणाला सुरुवात

Image
जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार लवकरच लसीकरणाला होणार सुरुवात; तीन डोस घेणे बंधनकारक जळगाव प्रतिनिधी: ओमायक्रॉनसारख्या  कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडलेली असतानाच आता लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.... आता आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या लसीकरणासाठी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. झायकोव्ह डी असे या लसीचे नाव आहे. या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस घ्यावे लागणार आहे. जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आठ लाख डोस मिळणार आहेत. लसीकरणाला देशभरात वेगात सुरुवात झाली. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. ओमायक्रोनसारख्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून लसीकरणासाठी जनजागृती करुन लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला येत आहे. झायकोव्ह डी लसीविषयी.. झायडस कॅडिला कंपनीची ही लस आहे. ही लस नीडल फ्री देण्यात येते आहे. सुईविना लस आता नागरिकांना दिली जाई...

चाळीसगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारी नराधमाला फाशी द्या

Image
चाळीसगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारी नराधमाला फाशी द्या   अन्याय अत्याचार निर्मुलन समीतीचे जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन...! जळगाव प्रतिनिधी: चाळीसगांव येथील अल्पवयीन पीडित मुलीसह तिच्या माता-पित्यांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल ला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगांव जिल्हाध्यक्षा ॲड.सिमाताई जाधव व जिल्हा कार्याध्यक्ष व  सौ.मनिषाताई पाटील यांनी सात्वनार्थ भेट देवुन सविस्तर चर्चा केली. व जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून पीडित कन्येच्या नातेसंबंधातील संबंधित लिंगपिसाट व मानवतेला काळीमा फासणार्या सावळाराम शिंदे या आरोपीचा खटला जलदगती  न्यायालयात सुरु करुन सदर नराधमांस फाशी व्हावी या करीता विषेश सरकारी वकीलांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून अशा हैवान आरोपीस फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.         यावेळी शिष्टमंडळात अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगांव जिल्हाध्यक्षा एँड.सिमाताई जाधव व जिल्हा कार्य...

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश रद्द: सुप्रीम कोर्टाचा महाविकास आघाडी सरकारला झटका

Image
ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश रद्द: सुप्रीम कोर्टाने दिला महाविकास आघाडी सरकारला झटका  नवी दिल्ली : ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. आगामी महापालिका, जिल्हापरिषद, नगर पंचायत निवडणुकांच्या दृष्टीकोनातून ही अत्यंत महत्वाची बातमी आहे.  आबीसींच्या 27 टक्के आरक्षण असलेल्या जागांच्या निवडणुकांवर कोर्टाने स्थगिती दिली आहे. इतर जागांच्या निवडणुकांमध्ये कोण्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याचे कार्टाने यावेळी स्पष्ट केले आहे. आगामी महाराष्ट्रातील स्थानिक विकास संस्थांच्या निवणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.      ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळं राज्य सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. खंपीठाने दिलेल्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाला ओबीसी आरक्षणासंदर्भात आधी अधिसूचित केलेल्या निवडणूक कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी परवानगी दिली जाऊ शकत नाही महाविकास आघाडी सरकार चा अध...

वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण

Image
वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ पर्यावरण सखी मंच आणि जायंटस गृप तर्फे वृक्षारोपण जळगाव प्रतिनिधी: दिनांक 04/12/2021 रोजी नूतन वर्ष कॉलनी येथे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. नगरसेविका ज्योतीताई चव्हाण, वेद इव्हेंट संचालिका सरिताताई खाचणे, अध्यक्षा मनीषा पाटील, सचिव ज्योती राणे, किमया पाटील, निशा चौधरी, रेणुका हिंगु यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण करण्यात आले.यात वड, पिंपळ, काशीद, जांभूळ, शिसम इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. यासह बेहडा या औषधी वनस्पतीचा देखील समावेश करण्यात आला. या प्रसंगी वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे हे रोप लावलेले असून संपूर्ण महाराष्ट्रात महिला पर्यावरण सखी मंचच्या माध्यमातून या कार्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहेत. हीच खरी श्रद्धांजली आबासाहेब मोरे यांना अर्पण करण्यात आली.याप्रसंगी लीलाधर भारुडे, सचिन तारे,हिमांशू कुटे, अतुल राठोड, अनुराग बिसकुटे, उदय शेळके, वैभव बावरे, स्वप्नील राऊत, रविनाना कोळी, सौ ...

जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत विविध उपक्रमांनी साजरा

Image
जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत विविध उपक्रमांनी साजरा इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा संयुक्त उपक्रम        जळगाव प्रतिनिधी:  दिनांक 03 डिसेंबर 2021 जागतीक आंतरराष्ट्रीय दिन हा इडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगांव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगांव व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगांव यांचे सयुक्त विदयमाने सादर करण्यात आला.त्यात सुरवातीला मा. श्री. अभिजित  राऊत ,जिल्हाधिकारी जळगांव व मा.श्री.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव तसेच इडीयन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी याचे  उपस्थीतीत  प्रतिमा पुजन करण्यात येऊन मान्यवराचे स्वागत करण्यात आहे.      तदनंतर मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव याचे समवेत कु. रक्षंदा विजय खैरनार , पिंपळगांव हरेश्वर ता पाचोरा या बहुविकलंाग विदयार्थीनीचा केक कापुर तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.        तसेच राष्ट्रीय न्यास ...

जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न

Image
जायन्ट्स ग्रुप जळगाव तेजस्विनीचा पदग्रहण सोहळा संपन्न जळगाव प्रतिनिधी :नुकताच जळगाव शहरात जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनीचा प्रथम पदग्रहण सोहळा संपन्न झाला. फेडरेशन उपाध्यक्ष संगीता पाटील व वसुंधरा जायंटस सहेली भुसावळ अध्यक्षा महानंदा पाटील यांच्या मार्गदर्शनाने अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या प्रयत्नांनी तेजस्विनी ग्रुपची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी प्रथम बेल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जायंटस वेलफेयर फाउंडेशनचे विश्व उपाध्यक्ष विजयकुमार चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली शपथ विधी करण्यात आला. यावेळी महापौर जयश्रीताई महाजन यांनी तेजस्विनी जायंटस कार्यकारिणी सदस्य म्हणून शपथ घेतली.याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्रीताई महाजन, जायंटस स्पेशल कमिटी मेंबर इंजि किशोर कुमार मिश्रा फेडरेशन अध्यक्ष डॉ संतोषकुमार मिश्रा, जळगाव जायंटस माजी अध्यक्ष पी ई तात्या पाटील, समाजकल्याण अधिकारी भरत चौधरी, महाराष्ट्रातील पारंपारिक पीक वाणाचे प्रथम संशोधक प्राचार्य डॉ एच एम पाटील, भुसावळ वसुंधरा सहेली अध्यक्ष महानंदा पाटील, फेडरेशन उपाध्यक्ष संगीता पाटील उपस्थित होते.  ...