स्वताच्या वडीलांचे पुतळे बसवले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला नाही;आ.मंगेश चव्हाण, चाळीसगाव शहरात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण

स्वताच्या वडीलांचे पुतळे बसवले पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसू दिला नाही;आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव शहरात मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण

चाळीसगाव प्रतिनिधी: गेल्या शेकडो वर्षांपासून सत्ता असलेल्यांमनी चाळीसगाव शहरात स्वताच्या बापाचे आणि आजोबांचे पुतळे बसवले परंतु हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम कायम बाजूला ठेवले असा घणाघात आ.मंगेश चव्हाण यांनी आज केला आहे.
         चाळीसगाव येथे गेली अनेक दशके वर्षे प्रलंबित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज,माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी चौक सिग्नल पॉइंट चाळीसगाव येथे करण्यात आले.
     याप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती संभाजी महाराज, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात का.उन्मेष पाटील, आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वेळोवेळी शासनदरबारी पाठपुरावा केला आणि म्हणूनच या ऐतिहासिक शहराच्या मध्यवर्ती भागात हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण आज करण्यात येत आहे.
         याप्रसंगी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशा पद्धतीने या स्मारकासाठी प्रयत्न केले आणि आ.चंद्रकांत दादा पाटील यांनी कशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले व आमदार मंगेशदादा चव्हाण आणि खासदार उन्मेशदादा पाटील यांनी कशा पद्धतीने प्रयत्न केले याचा उहापोह केला.
       यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजी महाराज,माजी मंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,माजी पालकमंत्री गिरीश महाजन, खा.उन्मेश पाटील,खा.रक्षाताई खडसे, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण, यांच्यासह आ.राजूमामा भोळे,आ.संजय सावकारे,जि.प.अध्यक्षा रंजना ताई पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व