महिला पतंजली योग समिती व जायंटस ग्रूप तेजस्विनी तर्फे मातोश्री आनंदाश्रमात (वृद्घाश्रम) योग शिबिराची सांगता
महिला पतंजली योग समिती व जायंटस ग्रूप तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम(वृद्घाश्रम) येथे योग शिबिराची सांगता
जळगाव प्रतिनिधी: दिनांक 10/12/ 2021 ते दिनांक 16/12/2021 या कालावधीत पतंजली योग समिती व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री आनंदाश्रम(वृद्धाश्रम) येथे योग शिबिर घेण्यात आले. यात हिवाळा या ऋतूत वयोमानाने घ्यावयाचे व्यायाम प्रकार योग प्राणायाम याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. सात दिवसाच्या या वर्गात विविध विषयांवर तज्ज्ञ व शिक्षकांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. आज दिनांक 16/12/2021 रोजी राज्य कार्यकारणी सदस्य महानंदाताई पाटील यांनी मुद्रा, ॲक्युप्रेशर प्रकार यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी अध्यक्षा मनीषा पाटील यांच्या सुरेल भजनाने सुरुवात करण्यात आली.
या प्रसंगी प्रकल्प प्रमुख मा संजय काळे यांचे स्वागत करण्यात आले. शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठी आजी-आजोबांना हास्यासन, श्वानासन, व सिंहासन इत्यादी आसने घेण्यात आली. या सर्वांच्या सक्रिय सहभाग घेतला गेला. याप्रसंगी भुसावळ येथील डॉक्टर राठी यांनी आजी आजोबांना बिस्कीट वाटप केले. तज्ञ योगशिक्षक व अध्यक्षा सौ मनीषा पाटील, राज्य कार्यकारणी सदस्य महानंदाताई पाटील, निशा चौधरी, जयश्री ताई पाटील, सीमा पाटील, रुद्राणी देवरे, श्री प्रकाश चव्हाण, प्रा अविनाश कुमावत अर्चना महाजन यांनी मार्गदर्शन केले. यासोबतच ॲड सीमा जाधव ,ज्योती राणे, नूतन तासखेडकर, निशा चौधरी या उपस्थित होत्या, योगराज चौधरी भारती कापडणे नवल पाटील रुपेश भोई ,कल्पना पाटील आज समारोप प्रसंगी उपस्थित होते. आजी-आजोबांच्या मनोगताने योग शिबिराची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment