मातोश्री वृद्धाश्रमात योग शिबिराचे आयोजन; महिला पतंजली योग समिती व जायंटस गृप ऑफ तेजस्विनी चा स्तुत्य उपक्रम

ऋतू हिवाळा आरोग्य सांभाळा यासाठी मातोश्री आनंदाश्रम (वृद्धाश्रम) येथील आजी आजोबांसाठी सात दिवसीय योग शिबिराचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी:  जळगाव येथील महिला पतंजली योग समिती व जायंटसग्रूप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री वृद्धाश्रम येथील आजी आजोबांसाठी दिनांक १०/१२/२०२१ ते १६/१२/२०२१ पर्यंत योग शिबिर आयोजित करण्यात आले असुन योगशिबिराचे दिप्प्रज्वलन व उद्घाटन ९६ वर्षीय मांडवगडे यांच्या शुभ हस्ते व आजी आजोबा यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षा मनिषा पाटील यांनी प्रकल्प सह प्रमुख संजय काळे यांचे स्वागत केले. योगासाठी सर्वांग सुंदर काळ ठरणारा हिवाळा व वाढणारी थंडी पाहता शारीरिक व मानसिक दृष्ट्या सुदृढ राहण्यास मार्गदर्शन करण्यासाठी हा सात दिवसाचा वर्ग वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्यासाठी आयोजित केला.
वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी आपले स्वास्थ कोणत्या योग व्यायामप्रकार करून या वयात साधता येईल याचे मार्गदर्शन यात करण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी आजी आजोबांनी हास्यासन करतांना मनसोक्त हसण्याचा आनंद घेतला. योगामध्ये भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम तसेच सूक्ष्म क्रिया हास्यासन, श्वानासन, सिंहासन घेण्यात आले असुन सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेतला. आजचा योग वर्ग मनिषा पाटील व प्रा अविनाश कुमावत या योग शिक्षकांनी घेतला. व पुढील नियोजन करण्यात आले असून यात सहभागी योग शिक्षक सौ मनिषा पाटील निशा चौधरी, महानंदाताई पाटील, जयश्रीताई पाटील रूद्राणी देवरे, प्रकाश चव्हाण,सीमा पाटील, माधुरी पाटील हे मार्गदर्शन करणार असुन आज या प्रसंगी समाज कल्याण अधिकारी भरत चौधरी, ॲड सीमा जाधव, ज्योती राणे, नूतन तासखेडकर, भारती कापडणे निशा चौधरी योगराज चौधरी, नवल पाटील, रुपेश भोई उपस्थित होते.

Comments

  1. खूप छान उपक्रम आपले काम खूप कौतुक करण्यासारखे आहे 🙏👋👋

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व