जागतिक दिव्यांग दिन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थीतीत विविध उपक्रमांनी साजरा
इंडियन रेड क्रॉस सोसायटी, जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांचा संयुक्त उपक्रम
जळगाव प्रतिनिधी: दिनांक 03 डिसेंबर 2021 जागतीक आंतरराष्ट्रीय दिन हा इडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगांव संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र जळगांव व समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद जळगांव यांचे सयुक्त विदयमाने सादर करण्यात आला.त्यात सुरवातीला मा. श्री. अभिजित राऊत ,जिल्हाधिकारी जळगांव व मा.श्री.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव तसेच इडीयन रेडक्रॉस सोसायटीचे पदाधिकारी याचे उपस्थीतीत प्रतिमा पुजन करण्यात येऊन मान्यवराचे स्वागत करण्यात आहे.
तदनंतर मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव याचे समवेत कु. रक्षंदा विजय खैरनार , पिंपळगांव हरेश्वर ता पाचोरा या बहुविकलंाग विदयार्थीनीचा केक कापुर तीचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय न्यास अधिनियम 1999 या कायदयान्वये मतिमंद व बहुविकलांग स्वमग्न सेरेबल पाल्सी मुलांना कायदेशीर पालकत्व प्रमाणपत्र 21 लाभार्थ्याना मान्यवराचे हस्ते देण्यात आले. तसेच केंद्र शासनाच्या व वैदयकीय महाविदयालय जळगांव यांचे मार्फत देण्यात आलेले स्वालंबन कार्डाचे वाटप मान्यवराचे हस्ते करण्यात आले.व जळगांव जिल्हयातील दिव्यांग शाळांमधील कोरोना मुळे निधन पावलेल्या कंत्राटी कर्मचारी कै. विनोद धोडु चव्हाण सफाईगार मतिमंद विदयालय पाचोरा व कै . रमाकांत हिरास्वामी नायडु , काळजी वाहक उत्कर्ष मतिमंद विदयालय जळगांव यांचे कुटुंबीयांना जिल्हयातील दिव्यांगशाळा मधील कर्मचारी व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी स्वेच्छेने केलेली मदत निधी रक्कम रुपये 50000/- सुपूर्द करण्यात आली.
तदनंतर रतनलाल सी बाफना फौडेशन तर्फे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केद्रंास प्राप्त झालेल्या मदत रुपी निधीतुन बहुविकलांग विदयार्थ्याना फिजियोथेरपीचे साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केद्रंात गेल्या सहा महिन्यापासुन डॉ.उल्हास पाटील फिजिओथेरपी महाविदयालय जळगांव येथील फिजिओथेरापिस्ट डॉक्टर यांनी दिलेल्या निशुल्क सेवे बददल प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन केलेल्या कार्याबददल गौरविण्यात आले.तसेच श्री निलेश चव्हाण हे बहुविकलांग व्यक्तीने मा.श्री.अभिजित राऊत ,जिल्हाधिकारी जळगांव श्री भरत चौधरी यांचे स्केच करुन भेट दिले. त्यांचे सर्वानी कौतुक केले.
याप्रसंगी मा.श्री.डॉ बाळासाहेब मोहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगांव , श्री. तुकाराम हुळहुळे, निवडणुक निर्णय अधिकारी, मा.श्री.मनोज बियाणी, श्री गनी मेमन , श्री. जी .टी .महाजन ,सौ. वर्मा मॅडम मा.श्रीमती मिनाक्षी ताई निकम, सौ मनिषा पाटील अध्यक्षा जॉयन्टस गृप ऑफ तेजस्वीनी जळगांव व नारीशक्ती जळगांव चे सर्व महिला पदाधिकरी तसेच चाळीसगांव येथील समाजसेवक मा.श्री. वर्धमानभाऊ धाडीवाल प्राचार्य श्री जयवंत नागुलकर व श्री विजय रायसिंग जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद जळगांव श्री. भरत चौधरी , श्री.एस पी गणेशकर व दिव्यंाग शाळांचे मुख्याध्यापक श्री संजय बोरसे, श्री एकनाथ पवार, श्री पदमाकर इंगळे व इतर मान्यवर उपस्थीत होते. कार्याक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment