चाळीसगाव येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारी नराधमाला फाशी द्या
अन्याय अत्याचार निर्मुलन समीतीचे जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन...!
जळगाव प्रतिनिधी: चाळीसगांव येथील अल्पवयीन पीडित मुलीसह तिच्या माता-पित्यांबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटल ला अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगांव जिल्हाध्यक्षा ॲड.सिमाताई जाधव व जिल्हा कार्याध्यक्ष व सौ.मनिषाताई पाटील यांनी सात्वनार्थ भेट देवुन सविस्तर चर्चा केली. व जळगांव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून पीडित कन्येच्या नातेसंबंधातील संबंधित लिंगपिसाट व मानवतेला काळीमा फासणार्या सावळाराम शिंदे या आरोपीचा खटला जलदगती न्यायालयात सुरु करुन सदर नराधमांस फाशी व्हावी या करीता विषेश सरकारी वकीलांची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून अशा हैवान आरोपीस फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्रदादा जाधव यांचे मार्गदर्शनाखाली केली आहे.
यावेळी शिष्टमंडळात अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगांव जिल्हाध्यक्षा एँड.सिमाताई जाधव व जिल्हा कार्याध्यक्षा सौ.मनिषाताई पाटील, नूतनताई खेडकर,रेणुका हिंगु ह्यांचा समावेश होता.
Comments
Post a Comment