गुलाबराव पाटलांची मंत्रीपदावरुन तत्काळ हकालपट्टी करा- चित्रा वाघ
जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सुप्रसिद्ध अभिनेत्री व भाजपा खा.हेमा मालीनी यांच्यावर शेरेबाजी करत एका महिलेचा विनयभंग केला असून त्यांची मंत्रीमंडळातून तत्काळ हकालपट्टी करा अशी आक्रमक मागणी भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
जळगाव प्रतिनिधी: सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारसभेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका करतांना तेथील रस्त्यांची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांसोबत करतांना जाहीरपणे म्हटले होते की,
"माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमामालिनी च्या गालांसारखे रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देऊन टाकेल" आणि आता या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याची सुरुवात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
गुलाबराव पाटील हा तर रांझ्याचा पाटील..
शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली
गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी कधी होणार?
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
Comments
Post a Comment