जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा
जळगाव प्रतिनिधी: जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती ग्रुप जळगाव तर्फे व्यसनमुक्ती कार्यक्रम द_दुधाचा द_दारूचा हा व्यसनाला आळा घालणारा उपक्रम दिनांक ३१/१२/२०२१ शुक्रवार रोजी शिव कॉलनी स्टॉप जळगाव येथे ठीक ४:०० वाजता आयोजीत करण्यात आला यावेळी समाजसेविका भारती कुमावत यांनी व्यसनांना बळी न पडता दारू ऐवजी दूध घेतले तरं आरोग्यासाठी हितकारक ठरेल व कुटूंब परिवार देखील आनंदी राहील.
तर अध्यक्ष मनिषा पाटील यांनी सांगितले की आज ३१ डिसेंबर सर्व पुरुष वर्गाने घरी दुधाचे पदार्थ नेऊन आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करावा.तसेच उपस्थित पुरुष वर्गाला प्रत्येकाने किमान पाच जणांना हा मोलाचा संदेश देऊन २०२१ सालासाठी उत्कृष्ट कार्य करून सरत्या वर्षाला निरोप द्यावा. व नवीन वर्षात चांगले संकल्प करावेत. याप्रसंगी प्रत्यक्ष दूध वाटप करण्यात आले. याप्रसंगी सुत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले तर आभार नूतन तासखेडकर यांनी मानले.यासाठी नेहा जगताप, पुष्पा पाटील, माधुरी शिंपी ॲड वैशाली बोरसे, डी एस कुमावत, संजय पगारे, मनोज पवार, नरेश कंडारे हे उपस्थित होते.प्रतिक्षा शिंपी यांचे अनमोल सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment