आता बिना सुईची कोरोना लस; जळगावमध्ये लवकरच लसीकरणाला सुरुवात
जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार
लवकरच लसीकरणाला होणार सुरुवात; तीन डोस घेणे बंधनकारक
जळगाव प्रतिनिधी: ओमायक्रॉनसारख्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडलेली असतानाच आता लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत....
आता आरोग्य विभागाकडून नीडल फ्री लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अशा प्रकारच्या लसीकरणासाठी
जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
झायकोव्ह डी असे या लसीचे नाव आहे. या लसीचे २८ दिवसांच्या अंतराने तीन डोस घ्यावे लागणार आहे. जळगाव आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना आठ लाख डोस मिळणार आहेत.
लसीकरणाला देशभरात वेगात सुरुवात झाली. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. त्या तुलनेत दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.
ओमायक्रोनसारख्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाकडून लसीकरणासाठी जनजागृती करुन लसीकरण वाढवण्यावर भर देण्यात आला येत आहे.
झायकोव्ह डी लसीविषयी..
झायडस कॅडिला कंपनीची ही लस आहे. ही लस नीडल फ्री देण्यात येते आहे. सुईविना लस आता नागरिकांना दिली जाईल. ज्यांना सुईची भीती वाटते त्यांच्यासाठी ही लस असेल. यामुळे लसीकरणाचा टक्का वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या लसीकरणाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस आणि ५६ दिवसांनी तिसरा डोस घ्यावा लागणार आहे. नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांत हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात येणार असून येथील प्रतिसाद बघून इतर जिल्ह्यातही त्याची व्याप्ती वाढविली जाणार आहे.
Comments
Post a Comment