बैलगाडा शर्यत शौकीनांनी केला आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी जल्लोष
गुलाल भंडारा उधळत बैलगाडा शर्यत शौकीनांनी केला आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी जल्लोष...
उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या भव्य बैलगाडा मोर्चाचे नेतृत्व करणारे आमदार मंगेश चव्हाण यांचा केला सत्कार
आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात केले जाणार बैलगाडा शर्यतीचे आयोजन,
चाळीसगाव - मा.सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविल्याने शेतकरी, शर्यतप्रेमींमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगांव येथे देखील उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा काढून तालुक्यातील बैलगाडा मालक,चालक तसेच शौकिनांनी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. आज चाळीसगाव तालुक्यातील सर्व बैलगाडा चालक, मालक,शर्यत शौकीन यांनी बैल, घोडे यासह वाजत गाजत येत आमदार मंगेश चव्हाण यांची त्यांच्या शिवनेरी निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी आमदार मंगेश चव्हाण व शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभा चव्हाण यांनी बैलांची पूजा केली. नंतर तेथे उपस्थित बैलगाडा प्रेमी यांनी गुलाल – भंडारा उधळत एकच जल्लोष केला व हलगीच्या तालावर नाचत आपला आनंद व्यक्त केला.
यावेळी भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, सरचिटणीस अमोल चव्हाण, कैलास पाटील, जितेंद्र पाटील, एड.कैलास आगोणे, राम पाटील, संतोष सोनवणे शिंदी, भास्कर सोनवणे शिंदी, योगेश चव्हाण हिंगोणे, विठ्ठल माउली चाळीसगाव, उत्तम आप्पा चौगुले, दीपक गायकवाड, छोटू पेहलवान, दादा बोराडे, शांताराम आबा वडाळा, अन्ना पाटील शिरसमनी, शरद पाटील वडगाव, प्रवीण पांचाळ बोरखेडा, नितीन पाटील डामरून, छोटू शेख, संभा पाटील वडाळा, बाळासाहेब पाटील रोकडे, विनोद अहिरे चाळीसगाव, बबलू आमले वडाळा, संभा पाटील बोरखेडे, भाऊसाहेब ठाकरे रांजणगाव, जीवन अहिरे हिंगोणे, बबलू चव्हाण हिंगोणे, भैय्या पाटील हिंगोणे, समाधान थेटे शिंदी, भूषण पाटील चाळीसगाव, ईश्वर आगोणे चाळीसगाव, दीपक मोरे डामरून, भैय्या जानराव पातोंडा, नितीन झगडे पातोंडा, नितीन तीकांदे शिंदी, समाधान चौधरी, गौतम सोनवणे, शेखर सोनवणे शिंदी आदी उपस्थित होते.
आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, राज्यातील बैलगाडा प्रेमींनी हा विषय लावून धरत प्रसंगी पदरमोड करत ठिकठिकाणी आंदोलने उभारली, अनेक वर्ष पाठपुरावा केला त्याचे हे यश आहे. चाळीसगाव तालुक्यात बैलगाडा शर्यत टिकावी यासाठी जानेवारी महिन्यात माजीमंत्री आ.गिरीषभाऊ महाजन व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय ‘सर्जा – राजा’ बैलगाडा स्पर्धा भरवून त्यांना प्रोत्साहन दिले जाईल असे आश्वस्त केले. सदर स्पर्धेसाठी माझ्यातर्फे पहिले बक्षीस बक्षीस बुलेट, द्सुरे पल्सर, तिसरे स्प्लेंडर, व चौथे बक्षीस प्लाटीना बाईक दिले जाईल असे देखील आमदार चव्हाण यांनी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
Comments
Post a Comment