वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण
जळगाव प्रतिनिधी: दिनांक 04/12/2021 रोजी नूतन वर्ष कॉलनी येथे वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या स्मरणार्थ महिला पर्यावरण सखी मंच व जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी यांच्या संयुक्त विद्यमानाने मा. नगरसेविका ज्योतीताई चव्हाण, वेद इव्हेंट संचालिका सरिताताई खाचणे, अध्यक्षा मनीषा पाटील, सचिव ज्योती राणे, किमया पाटील, निशा चौधरी, रेणुका हिंगु यांच्या हस्ते पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण करण्यात आले.यात वड, पिंपळ, काशीद, जांभूळ, शिसम इत्यादी वृक्षांची लागवड करण्यात आली. यासह बेहडा या औषधी वनस्पतीचा देखील समावेश करण्यात आला. या प्रसंगी वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे हे रोप लावलेले असून संपूर्ण महाराष्ट्रात महिला पर्यावरण सखी मंचच्या माध्यमातून या कार्याचे वटवृक्षात रूपांतर होत आहेत. हीच खरी श्रद्धांजली आबासाहेब मोरे यांना अर्पण करण्यात आली.याप्रसंगी लीलाधर भारुडे, सचिन तारे,हिमांशू कुटे, अतुल राठोड, अनुराग बिसकुटे, उदय शेळके, वैभव बावरे, स्वप्नील राऊत, रविनाना कोळी, सौ सुनीता जाखेटे, योगिता पाटील,सार्थक पाटील, भारती पाटील, रेखा भारुळे,इ. उपस्थित होते.
अभिनंदन व शुभेच्छा
ReplyDelete