वारकरी संप्रदायाच्या अपमानाबाबत पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी मागितली जाहीर माफी
वारकरी संप्रदाय सहनशील व चुका पोटात घेणारा, पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्याकडून अनवधानाने झालेल्या चुकीबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे त्यांना मोठ्या मनाने माफ करावे – आमदार मंगेश चव्हाण वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या सोबत आमदार कार्यालय येथे बैठक संपन्न, चाळीसगाव प्रतिनिधी - काल दि.२७ एप्रिल रोजी रात्री चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ कीर्तन सप्ताह कार्यक्रम १० वाजेनंतर सुरु असल्याचे लक्षात येताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी त्याठिकाणी जाऊन सदर माईक बंद केला तसेच वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या गेलेल्या नारदाच्या गादीवर बुटासहित पाय ठेवले गेल्याची घटना घडली होती. सदर फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले असता राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काल मध्यरात्री याबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनादेखील ही बातमी कळली असता तसेच चाळीसगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर व विविध हिंदुत्ववादी संघटना...