रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत भोंगे वाजू नका; चाळीसगाव ग्रामीण पोलीस निरीक्षकांचे आवाहन
दिनांक २२/०४/२०२२ रोजी चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे साहेब यांनी चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिर कमिटी मजिद ट्रस्टी, मोलाना पुजारी, पंच मंडळी व गावातील प्रतिष्ठीत नागरीक यांची पंचायत समिती हॉल, चाळीसगांव येथे बैठक घेतली.
सदर बैठकीत मंदिर व मशिद वा अन्य धार्मिक स्थळांवर भोंगे व ध्वनी क्षेपक लाऊडस्पीकर रात्री १०.०० ते सकाळी ०६.०० वा. च्या दरम्यान कोणत्याही परिस्थीत भोंगा व लाऊडस्पीकरचा कोणीही वापर करणार नाही असे यावेळी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे साहेब यांनी समजावून सांगितले. माननीय सर्वोच्च न्यायालयाने २००५ मध्ये दिलेल्या आदेशाची माहिती ही त्यांनी यावेळी उपस्थीतांना दिली. मंगल कार्यालय, लग्न समारंभ, सामाजिक व धार्मिक गिरवणुकांनमध्ये रात्री १०.०० वा. नंतर कोणीही साऊंड सिस्टीम व पारंपारीक वाद्ये बॅन्ड हे वाजविणार नाही याबाबत समज दिली. दरम्यान प्रसंगी बैठकीत उपस्थित सर्व धर्मीय नागरिकांनी आम्ही आमच्या गावांत रात्री १०.०० ते सकाळी ०६.०० वा. पावेतो कोणतेही भोंगे, लाऊडस्पिकर वाजविणार नाहीत असा सर्वानुमते निर्णय घेतला मंदिर व मुस्लिम समुदायाने हि नियमाचे तंतोतंत पालन करण्याची ग्वाही दिली. या बैठकीला चाळीसगांव ग्रामीण पोस्टे हद्दीतील वाघळी, भोरस, रांजणगांव, पिंपरखेड, पाटणा, तरवाडे, जामडी, हिरापुर, तांबोळा येथील मंदिर कमिटी, मशिद ट्रस्टी, मोलाना, पुजारी व सर्व समाजाचे प्रतिष्ठीत नागरीक मोठ्या संखेने उपस्थीत होते.


Comments
Post a Comment