चैतन्य तांडा ग्रामपंचायतीच्या वतीने जि.प शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्याहस्ते लोकार्पण...

 


चाळीसगाव प्रतिनिधी: तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत १४ वित्त आयोगातून एकूण १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. याचे लोकार्पण चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आज करण्यात आले असून शासन निर्देशानुसार जि.प. शाळेत सीसीटीव्ही बसविणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.



 एकीकडे शासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत आवाहन करण्यात येत असताना त्यापूर्वीच चैतन्य तांडा ग्रामपंचायतीने केलेली कामगिरी हि कौतुकास्पद आहे. याचे लोकार्पण आ. मंगेश चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यामुळे चोरी व गैरकृत्याचे प्रमाण आटोक्यात येणार असून चोरट्यांवर अंकुश ठेवता येणार असल्याचे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण व गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी केले आहेत. दरम्यान २२ नोव्हेंबर २०२१ रोजी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबतचा पत्र पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ग्रामपंचायतींना आवाहन केले होते. या पत्रावर लागलीच कृती करून चैतन्य तांडाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. यावेळी ग्रामपंचायतीच्या 


शासकीय इमारत बांधण्यासाठी सुमित घनश्याम शर्मा यांनी पाच गुंठे जमीन निःशुल्क दिली आहे. त्यांचा सन्मान आ. मंगेश चव्हाण यांनी केला. यावेळी संगणक अभियंता गुणवंत सोनवणे, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलाताई भाऊसाहेब जाधव, सहायक बिडीओ माळी, मा सभापती जाधव ,राजेंद्र भाऊ राठोड तळोदे, ग्रामसेवक कैलास जाधव, भाजपाच्या नमो ताई, राठोड, सरपंच आणि ता दिनकर राठोड उपसरपंच आनंद भाऊ राठोड ग्रामपंचायत सदस्य अनिता चव्हाण राजेंद्र चव्हाण साईनाथ राठोड प्रवीण चव्हाण वसंत भाऊ राठोड संदीप गावातील ग्रामस्थ उदल भाऊ राठोड जुलाल भाऊ राठोड    उद्दल पवार संतोष पवार मनिषा ताई पाटील

उदल राठोड पदम तवर रायसिंग राठोड रघुनाथ राठोड सूत्रसंचालन बेलदार सरांनी केलं चौधरी मॅडम देवरे सर राजेंद्र पाटील सर जिल्हा परिषद शाळा विविध चिंचगव्हान चे सुभाष राठोड जूनोने चे गोरख राठोड सरपंच बिलाखेड चे डी एम पाटील फकीरा भाऊ पाटील उपसरपंच ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रा.पं. सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व