फैजपूर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन वतीने अभिवादन
फैजपूर प्रतिनिधी: भारतरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त फैजपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास शहरातील विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबासाहेबांच्या स्मारक परिसरात विद्यूत रोषणाई सह फुलांची सजावट करण्यात आली होती. यावेळी बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीने चहा-पोहे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी फैजपूर येथील पोलीस स्टेशन चे पीएसआय लोखंडे साहेब, खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त फैजपूर येथील बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजयभाऊ मेढे व मित्र परिवार यांच्यासह सर्व पदाधिकारी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment