डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे सामान्यज्ञान स्पर्धा

किशोर शेवरे चाळीसगांव प्रतिनिधी:  १४ एप्रिल या सोनेरी दिवसाचे सामाजाच्या व देशाच्या दृष्टिने अत्यंत महत्त्व आहे.या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने दिवसभर खेड्यापासुन ते दिल्लीपर्यंत बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते.त्याचप्रमाणे तालुक्यातील ओढरे येथील ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन तर्फे डाॅ.आंबेडकरांच्या जीवनावर आधारीत प्रश्नावली तयार करुन सामान्यज्ञान स्पर्धेद्वारे बाबासाहेबांना अभिवादन देण्यात आले.
          आज बाबासाहेब आंबेडकरांचे  साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.त्यांचे अनमोल विचार,साहित्य व कार्याची तरुणांना माहिती व्हावी  याकरीता ओढरे गावातील जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांकडुन तसेच इतर तरुणांकडुन बाबासाहेबांच्या जीवनावरील प्रश्नावली सोडवून घेण्यात आली. अध्यक्ष अशोक राठोड यांच्याकडुन सदर सामान्यज्ञान स्पर्धेचे ऑफलाईन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने आयोजन करण्यात आले होते.सदर सामान्यज्ञान स्पर्धेला ओढरे गावासह तालूक्यातूनही उत्स्फुर्तपणे सहभाग लाभला.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व