आईचे प्रेत घरात असतांना त्याने दिली परीक्षा

 



चाळीसगाव प्रतिनिधी : नियती अनेक वेळा वेगवेगळ्या मार्गाने माणसाची परीक्षा घेत असते. अशीच परीक्षा तरवाडे येथील विद्यार्थी मंगेश राजीव सोनवणे याच्यावर आली. घरची परिस्थिती सर्वसाधारण, गरिबीचीे अशातच दहावीची परीक्षा सुरू असताना अचानक आई मंगलाबाई राजीव भिल्ल यांची तब्येत बिघडली व मंगेश चां शेवटचा पेपरच्या दिवशी मंगेश्याच्या आई मंगलाबाई  भिल्ल (वय ४१) यांचे  अचानक निधन झाले. संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
          आई चे अकाली निधन हा मंगेश च्या जीवनातील  सर्वात दुःखद प्रसंग व त्याच वेळेला दहावी चा शेवटचा पेपर . आईचे प्रेत घरात असताना परेक्षेची वेळ जवळ आलेली. या प्रसंगात सामजिक कार्यकर्ते  डॉक्टर रविंद्र मराठे  व इतर ग्रामस्थांनी  या दुःखद प्रसंगी सात्वन करत मंगेशची समजूत घातली व परीक्षा देण्याची हिंमत दिली व मंगेश ने परीक्षेला हजर राहण्याचा निर्णय घेतला.
       खरोखर नियती कधीकधी माणसांची खूप कठीण परीक्षा घेते. दुःख बाजूला ठेऊन कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. मंगलाबाई राजीव भिल्ल या तरवाडे गावच्या माजी सरपंच व सध्याचे सरपंच राजीव रतन भिल्ल यांच्या पत्नी होत.

Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व