जागतिक वसुंधरा दिनी महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव वतीने पक्षांसाठी परळ व धान्य वाटप



जळगाव प्रतिनिधी:  जागतिक वसुंधरा दिनानिमित्त महिला पर्यावरण सखी मंच व नारीशक्ती बहुद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उन्हाळ्याची तीव्रता जाणवता नामशेष होणाऱ्या पक्षांना पाणी देऊन जीवनदान मिळावे या उद्देशाने बहीणाबाई उद्यान येथे पक्षांसाठी परळ व धान्य वाटप कार्यक्रम घेण्यात आला. पक्षांना उन्हाच्या तीव्रतेपासून वाचविण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संगोपन करून परळ द्वारा दाणापाण्याची सोय करावी या उद्देशाने संवेदनशील भावनेतून हा स्तुत्य कार्यक्रम घेण्यात आला.


 या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.नीलिमा सेठीया व अध्यक्ष मनिषा पाटील यांच्या हस्ते परळ वाटप करण्यात आले. याप्रसंगी नेहा जगताप, किमया पाटील, नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, संजय साळुंखे, कविता पाटील, उल्का पाटे ,वैशाली शिरूडे, आशा मौर्य ,संगीता ठाकूर , रेणुका हिंगु ,शशी शर्मा, योगिता बाविस्कर ,पुनम पाटील, वंदना पाटील, तेजस्विता जाधव ,रंजना पावरा, नेहा पावरा  यांचे अनमोल सहकार्य लाभले. सूत्रसंचलन पुनम पाटील यांनी केले तर आभार नूतन तासखेडकर यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

खान्देश नारीशक्ती चा राज्यस्तरीय नारीदिप सन्मान पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

होय आम्ही शिकणार.. संघर्ष करणार - चाळीसगाव येथील स्व.रामराव जिभाऊ पाटील शिष्यवृत्ती प्राप्त ४२५ विद्यार्थ्यांनी केला निर्धार ; आ.मंगेश चव्हाण यांचे शैक्षणिक दातृत्व